Night Clubs In Goa: आसगावकरांचा 'नाईट क्लब'ला विरोध; अपघात, तरुणांच्या भवितव्याची भीती

Night Clubs In Goa: आसगाव ग्रामस्थ या नाईट क्लब संस्कृतीच्या विरोधात एकवटले आहेत.
Night Clubs
Night ClubsDainik Gomantak
Published on
Updated on

Night Clubs In Goa

आसगाव पंचायत कार्यक्षेत्रातील मुनांगवाडा येथे दाट लोकवस्तीत नाईट क्लबसदृश इमारतीच्या विरोधात संपूर्ण गाव एकवटला. बुधवारी (ता.२९) स्थानिकांनी या कथित डिस्को क्लबच्या विरोधात मेणबत्ती फेरी काढली. सायंकाळी श्री बारा साखळेश्वर देवस्थान ते या क्लबच्या बांधकामापर्यंत ग्रामस्थांनी हातात मेणबत्ती आणि फलक घेऊन शांततेत पायी फेरी काढली.

आसगाव-बादे नागरिक कृती समितीच्या अध्यक्षतेखाली ही फेरी काढण्यात आली होती. गावकऱ्यांचे म्हणणे आहे, आसगावात नाईट क्लब उभारल्यास शांतता भंग होईल. तरुणाई वाईट मार्गाला लागेल.

रात्रीच्या वेळी वाहतुकीत वाढ होऊन अपघातांना आमंत्रण मिळेल. दारूच्या नशेत येथे येणाऱ्यांवर कुणाचेच नियंत्रणात नसेल.

सुरेंद्र गाड म्हणाले की, आधीच गावातील जमिनी बिगर गोमंतकीयांनी बळकावून येथील गावपण हरविले आहे. अशातच नाईट क्लबसारखी संस्कृती येथील शांतता तसेच पूर्ण गावपण उद्ध्वस्त करेल. या नाईट क्लबला ग्रामस्थांचा तसेच स्थानिक पंचायत मंडळाने विरोध केला आहे.

त्याचप्रमाणे स्थानिक आमदारांनी लोकांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे सांगत गावकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. केवळ आसगावमधील नव्हे, तर शेजारील शिवोली, हणजूण, शापोरा या भागांतील लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिलाय, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आइनस्टाईन बार्रेटो म्हणाले की, आसगाव ग्रामस्थ या नाईट क्लब संस्कृतीच्या विरोधात एकवटले आहेत. कारण, ही संस्कृती गावातील कायदा-सुव्यवस्था बिघडवेल. येथील शांतता आम्हाला भंग करायची नाही. कारण यापूर्वीच मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट व पब आलेत. परिणामी गावामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. लोकांना चालणे मुश्किल बनले आहे.

Night Clubs
Goa Kala Academy: गळती रोखण्‍यासाठी गोव्याच्या 'ताजमहाला'वर ताडपत्री टाकण्याची नामुष्‍की

‘एनओसी’ नाकारली

सुरवातीला संबंधितांनी (क्लबकडून) तात्पुरता बार-रेस्टॉरंटसाठी परवानगी घेतली होती. कालांतराने या क्लबचे बांधकाम पाहून ग्रामस्थांना लक्षात आले की, याठिकाणी नाईट क्लब उभा राहात आहे. त्यानंतर लोकांनी एकत्रित येत या कथित नाईट क्लबला विरोध केला.

सध्या पंचायतीने या क्लबने मागितलेली एनओसी व व्यापार परवानगी नाकारली आहे. कुठल्याही स्थितीत गावात नाईट क्लब सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्‍थांनी घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com