Cooch Behar Trophy Dainik Gomantak
गोवा

Cooch Behar Trophy: कुचबिहार करंडकमध्ये फॉलोऑननंतर गोव्याची घसरण!

मुंबईला सामना डावाने जिंकण्याची संधी

Kishor Petkar

Cooch Behar Trophy: सलामीचा फलंदाज वीर यादव याच्या शैलीदार ७३ धावांनंतरही गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की आली, नंतर दुसऱ्या डावात ४ विकेट ११० धावांत गमावल्यामुळे कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याचा संघ पराभवाचा छायेत आला. मुंबईचा संघ अजूनही ९२ धावांनी पुढे असून त्यांना डावाने विजयाची संधी आहे.

स्पर्धेच्या अ गटातील सामना कांदिवली-मुंबई येथील सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर सुरू आहे. मुंबईने पहिला डाव ९ बाद ४०३ धावांवर घोषित केला. त्यानंतर कालच्या बिनबाद ३७ धावांवरून गोव्याचा पहिला डाव शनिवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २०१ धावांत संपुष्टात आला.

त्यामुळे मुंबईला २०२ धावांची आघाडी मिळाली. वीर व शंतनू नेवगी यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. नंतर वीर याने निसर्ग नागवेकर याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भर टाकली, मात्र निसर्ग बाद होताच जम बसलेला वीर सुद्धा यष्टिचीत बाद झाला.

गोव्याचा डाव ५ बाद १४१ असा कोसळला असता, कर्णधार पुंडलिक नाईक व यश कसवणकर यांनी सहाव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली, पण ते फॉलोऑन टाळू शकले नाहीत.

शंतनू नेवगी व वीर यादव यांनी दुसऱ्या डावात चांगली सुरवात केली, परंतु वीर बाद होताच गोव्याला पुन्हा नियमित अंतराने धक्के बसले. त्यातच निसर्ग नागवेकरही धावबाद झाला. दिवसअखेर ४६ धावांवर नाबाद असलेल्या शंतनू याच्यावर आता गोव्याची दुसऱ्या डावात मदार आहे.

संक्षिप्त धावफलक

मुंबई, पहिला डाव ः ९ बाद ४०३ घोषित.

गोवा, पहिला डाव ः ६६.१ षटकांत सर्वबाद २०१ (वीर यादव ७३- ९५ चेंडू, ११ चौकार, २ षटकार, शंतनू नेवगी १८, निसर्ग नागवेकर २०, यश कसवणकर ३४, दिशांक मिस्कीन ११, जीवन चित्तेम ०, पुंडलिक नाईक ३७, कौस्तुभ पिंगुळकर ०, युवराज सिंग ०, रुद्रेश शर्मा ०, स्वप्नील गावकर नाबाद ०, अथर्व भगत ३६-१, उमर खान ३५-४, कार्तिकेय शुक्ला ३९-२, मनन भट २७-३).

गोवा, दुसरा डाव ः ३१ षटकांत ४ बाद ११० (वीर यादव ३२, शंतनू नेवगी नाबाद ४६, यश कसवणकर १०, निसर्ग नागवेकर ०, दिशांक मिस्कीन १६, जीवन चित्तेम नाबाद ४, उमर खान २०-१, मनन भट २५-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT