Board Of Control For Cricket In India: मोठा पराभव! गोव्याच्या मुलींचा संघ अवघ्या 8 धावांत गारद

Board Of Control For Cricket In India : राज्य क्रिकेटची नामुष्की: 15 वर्षांखालील स्पर्धेत मोठा पराभव
 Cricket
CricketDainik Gomantak

Board Of Control For Cricket In India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा नीचांक शनिवारी हरियानातील लाहली येथे नोंदीत झाला. चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर गोव्याचा 15 वर्षांखालील मुलींचा संघ अवघ्या 8 धावांत गारद झाला.

15 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून सुरवात झाली. सामने प्रत्येकी 35 षटकांचे असून गोव्याचा समावेश ड गटात आहे. तमिळनाडू, सिक्कीम, बिहार, महाराष्ट्र हे गटातील अन्य संघ आहेत.

 Cricket
All Goa Toddy Tappers Association: ताडी टॉपर्स संघटनेमध्ये वादाची ठिणगी; संघटनेच्या सदस्यांनी केलेत 'हे' आरोप

बंगालविरुद्ध गोव्याचा डाव 9.2 षटकांत संपुष्टात आला. नोंदविलेल्या आठ धावांत चार धावा अतिरिक्त होत्या, यामध्ये तीन वाईड व एका लेगबाय धावेचा समावेश आहे. सात जणींना भोपळाही फोडता आला नाही. बंगालच्या अंजली बर्मन हिने फक्त तीन धावा देत सहा विकेट टिपल्या.

 Cricket
Mapusa- Siolim Road: ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने म्हापसा-शिवोली रस्त्यावर वाहतूक कोंडी

याच खेळपट्टीवर बंगालने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकांत 3 बाद 274 अशी मोठी धावसंख्या रचली. गोव्याचा संघ दोन अंकी धावसंख्याही गाठू न शकल्यामुळे बंगालला 266 धावांच्या फरकाने दणदणीत विजय नोंदविता आला.

त्यांची कर्णधार इप्सिता मोंडल हिने नाबाद 79, प्रियांका गोल्दर हिने 40, तर संदीप्ता पत्रा हिने नाबाद 51 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com