Goa’s cricketer Mohit Redkar Dainik Gomantak
गोवा

Mohit Redkar: अभिमानास्पद! गोव्याच्या मोहित रेडकरला भारतीय 'अ' संघात स्थान, राखीव खेळाडूंत निवड

बीसीसीआयने जाहीर केलेल्या 19 सदस्यीय संघात मोहित रेडकरला स्थान देण्यात आले आहे.

Pramod Yadav

Goa’s cricketer Mohit Redkar: गोव्याचा रणजीपटू आणि अष्टपैलू क्रिकेट खेळाडू मोहित रेडकरला 23 वर्षाखालील भारतीय 'अ' संघात स्थान मिळाले आहे. आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी मोहितची राखीव संघात निवड झाली आहे. मोहित आणि अर्जुन तेंडुलकर यांची 23 वर्षाखालील भारतीय भारतील संघाच्या संभाव्य यादीत निवड झाली होती.

श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयने मंगळवारी (दि.04) या संघाची घोषणा केली.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या 19 सदस्यीय संघात मोहित रेडकरला स्थान देण्यात आले आहे. या संघाचे नेतृत्व दिल्लीच्या यश धूल याच्याकडे देण्यात आले असून, उपकर्णधारपद पंजाबच्या अभिषेक शर्मा याच्याकडे देण्यात आले आहे.

रणजीत पदार्पण करत मोहितने अष्टपैलू खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोहितने सात सामन्यात 19 बळी घेत 238 धावा कुटल्या होत्या. नावेली दिकरपाली येथील 22 वर्षीय मोहित भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलेला गोव्याचा सहावा खेळाडू आहे.

श्रीलंकेत आशियाई क्रिकेट कॉन्फेडरेशनची एकदिवसीय स्पर्धा होत आहे. 13 ते 23 जुलै या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत भारत, युएई, पाकिस्तान व नेपाळ असा एक तर, अफगाणिस्तान, बांग्लादेश, ओमान व श्रीलंका असा दुसरा गट आहे.

असा आहे भारतीय संघ

यश धूल (कर्णधार), अभिषेक शर्मा (उप-कर्णधार), निकीन जोस, प्रदोष रंजन पॉल, रियान पराग, निशांत सिंधू प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मानव सुथार, युवराजसिंग दोडिया, हर्षीत राणा, आकाश सिंग, नितीशकुमार रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर.

राखीव- हर्ष दुबे, नेहाल वढेरा, स्नेल पटेल व मोहित रेडकर. सितांशू कोटक (मुख्य प्रशिक्षक), साईराज बहुतुले (गोलंदाजी प्रशिक्षक), मनीष बाली (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT