Goa Covid News Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Update| गोव्यात राष्ट्रीय स्तरापेक्षाही चौपट संक्रमण दर

कोविडचे 109 नवे बाधित; 139 रुग्ण बरे

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने बदल होत असून आजचा संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) हा राष्ट्रीय स्तरापेक्षा चौपट आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता नागरिकांनी कोरोनासंबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

(Goa's Corona infection rate is four times the national level)

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनामध्ये होणारे बदल लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचे नियम कडक केले असून ते आज शनिवारपासून लागू होत आहेत. आज कोरोनाच्या 1,219 संशयितांच्या चाचण्या केल्या असता त्यापैकी 109 नवे बाधित सापडले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 561 झाली आहे. आज 139 जण कोरोनामुक्त झाले. शनिवारी कोरोनामुळे कुणाचा बळी गेला नसल्याने एकूण मृत्यूंचा आकडा 3,963 वर कायम आहे. राज्यात आतापर्यंत 2,56,409 नागरिकांना कोविडची बाधा झाली असून 2,51,885 लोक पूर्णपणे बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.24 टक्के आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

SCROLL FOR NEXT