Goa OnlinT taxi service: गोवा सरकारने राज्यात ॲप-आधारित टॅक्सी सेवा कार्यान्वित करण्यासाठी टॅक्सी एग्रिगेटर मार्गदर्शक तत्वांचा मसुदा २० मे रोजी अधिसूचित केला असून, यावर ३० जूनपर्यंत संबंधित घटकांनी आपले अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) यांनी केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणातून राज्यातील नागरिकांनी टॅक्सी अॅप आणि ॲग्रिगेटर सेवेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या सर्वेक्षणात एकूण ४,९५० नागरिकांनी सहभाग नोंदवला असून, त्यापैकी ४,६५० लोकांनी टॅक्सी अॅप आणि ॲग्रिगेटर यंत्रणेस पाठिंबा दर्शविला आहे. ही बाब राज्यात अॅप-आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांना बळ देणारी आहे.
टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा सर्वेक्षण उपक्रम सरकारने टॅक्सी ॲग्रिगेटर धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर सुरू करण्यात आला होता. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता, यामध्ये जनतेचा स्पष्ट कल दिसून येतो. सर्वेक्षणाच्या फॉर्ममध्ये सूचना आणि अभिप्राय देखील मागविण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.