Panaji City Environment Dainink Gomantak
गोवा

Panaji Enviornment: राजधानी पणजी हवामानाच्या दृष्टीने असुरक्षित; सर्व्हेत मिळाले केवळ 2 स्टार रेटिंग

शहराला हवामान बदलाचा मोठा धोका

Akshay Nirmale

Panji Enviornment: हवामान सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नात देशात सर्वेक्षण केलेल्या 15 भारतीय शहरांमध्ये गोव्याची राजधानी पणजी हे शहर मागे पडले आहे. पणजी शहराची कामगिरी यादृष्टीने वाईट झाली आहे. या यादीत अहमदाबाद टॉपवर आहे. याचा अर्थ अहमदाबादची अवस्था पणजीपेक्षाही वाईट आहे.

क्लायमेट सेंटर फॉर सिटीज आणि ICLEI दक्षिण आशियाने याबाबतचा अहवाल केला आहे. आणि त्यामध्ये पणजीला केवळ दोन-स्टार रेटिंग देण्यात आले आहे. याचा अर्थ पणजी शहराला त्यात खूप सुधारणा करणे आवश्यक आहे.

याचे सर्वात मोठे कारण आहे पणजीतील वाहतूक. पणजीत सर्वाधिक उर्जा वापर वाहतूक क्षेत्रात होतो. येथे 64.8 टक्के कार्बन इंधन वापरले जाते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार या 15 शहरांमध्ये पणजीमध्ये दरडोई ऊर्जा वापर, दरडोई वीज वापर आणि दरडोई हरितगृह वायूंचे उत्सर्जन या डेटाचे एकत्रित विश्लेषण केले गेले.

पणजीसाठी हवामान कृती आराखडा आवश्यक आहे. कारण हे शहर किनारपट्टीवर आहे. कुरे खाडी, सांत इनेज खाडी, मांडवी आणि झुआरी नदीमधील बॅकवॉटरवरील खारफुटीचे जतन, संवर्धन गरजेचे आहे. अन्यथा या हवामान बदलाची मोठी किंमत चुकवावी लागू शकते,” असे अहवालात म्हटले आहे.

पर्यटनाची शाश्वत पद्धत, अक्षय उर्जा स्त्रोतांना प्राधान्य, महत्वाच्या परिसंस्थांचे जतन, हवामानास अनुकूल कृषी तंत्रांचा अवलंब करणे ही आवश्यक पावले त्यासाठी उचलणे गरजेचे आहे.

या अभ्यासात अहमदाबाद, कोईम्बतूर, ग्वाल्हेर, कोची, नागपूर, पिंपरी चिंचवड, राजकोट, शिमला, सिलीगुडी, ठाणे, तिरुचिरापल्ली, तिरुनेलवेली, उदयपूर आणि वडोदरा या शहरांचाही समावेश आहे.

जलद नागरीकरण, कचरानिर्मिती, उर्जावापर यातून ही गजबजलेली केंद्रे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जनाचे केंद्र बनली आहेत. लोकसंख्या वाढते तसा संसाधनांवर ताण येतो, त्यातून पर्यावरणीय समस्या आणि हवामान बदल वाढतात, असेही अहवालात म्हटले आहे.

पर्यावरणपूरक धोरणांचा स्वीकार करण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे. तरच शहरी झगमगाट आटोक्यात आणून हिरव्यागार, अधिक लवचिक भविष्यासाठी मार्ग तयार करता येईल, असे अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT