Panaji Air Quality
Panaji Air Quality Dainik Gomantak
गोवा

Panaji Air Quality: राजधानी पणजीने दिल्ली, मुंबई, बंगळूरला टाकले मागे

Akshay Nirmale

Panaji Air Quality: देशातील सर्वाधिक प्रदुषित हवा असलेल्या दिल्ली, मुंबई, बंगळूर या शहरांना गोव्याची राजधानी पणजीने मागे टाकले आहे. गोव्यातील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवामान मीटरवर खराब श्रेणीत गेली आहे.

शुक्रवारी 10 मार्च रोजी रात्री रात्री 9 च्या सुमारास पणजीतील रियल टाईम एअर क्वालिटी इंडेक्स (हवा पात्रता निर्देशांक) 123 इतका होता. तर म्हापसा, पेडणे येथील किनारी भागात हा निर्देशांक 125 इतका आणि फोंडा येथे 133 नोंदवला गेला आहे.

एकूणच गोव्यातील गुणवत्ता 'खराब' म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे.

अगदी देशाची राजधानी दिल्ली आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही गोव्यातील एअर क्वालिटी इंडेक्स कमी आहे. दिल्लीत 109 आणि मुंबईत 115 हवेची गुणवत्ता नोंदवली गेली, तर बंगळुरूमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स 54 इतका नोंद झाला आहे.

शून्य ते 50 यामधील AQI (एअर क्वालिटी इंडेक्स) चांगला मानला जातो; 51 ते 100 यामधील एक्युआय समाधानकारक मानला जातो तर 101 ते 200 मधील एक्युआय मध्यम आणि 201 ते 300 वाईट, 301 ते 400 मधील अत्यंत वाईट आणि 401 ते 500 मधील गंभीर समजला जातो.

गेल्या काही दिवसांपासून AQI 100 किंवा त्याहून अधिक नोंदवणाऱ्या पणजीमध्ये सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यामुळे तसेच वाहनांमुळे येथे प्रदुषणात भर पडली आहे.

पार्टिक्युलेट मॅटर 10 (PM10) बाबत देशातील 389 शहरांमध्ये राजधानी पणजी 230 व्या क्रमांकावर आहे तर दोन औद्योगिक युनिट झोन आणि उप-शहरांसह इतर आठ ठिकाणी देखील PM 10 पातळी सुरक्षित 60 µg/m3 पेक्षा जास्त आहे.

कुंकळ्ळी येथे 67, उसगाव-पाले 64, फोंडा 63, कोडली 62, कुंडई 62, तिलामोल 62, डिचोली 61 आणि होंडा येथे 61 आहे. दरम्यान, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापुर्वीच राज्यातील खाण पट्टा, पणजी आणि कुंडईच्या ग्रामीण भागात प्रदूषणाची गंभीर पातळी ओलांडल्याचे म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Goa Today's Live News: रात्री १० वाजल्यानंतर लाऊड स्पीकर लावण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Goa Rain Update: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT