BITS Pilani K K Birla Goa Campus Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील BITS Pilani पुन्हा हादरलं! आणखी एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं; वर्षातील पाचवी घटना

BITS Pilani Goa News: बीट्स पिलानीत विद्यार्थांचे मानसिक आरोग्य आणि त्यासाठी मार्गदर्शन व अभ्यासक्रमाचा ताण याबाबत पुन्हा एकदा सवाल उपस्थित केला जात आहे.

Pramod Yadav

वास्को: गोव्यातील बीट्स पिलानी कॅम्पस पुन्हा एकदा हादरला आहे. महाविद्यालयातील वीस वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करुन आयुष्य संपवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभराच्या कालावधीत पाच विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आत्महत्या केल्या आहेत. कॅम्पसमध्ये होत असलेल्या आत्महत्येंच्या सत्रामुळे बीट्स पिलानीच्या प्रशासनावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ऋषी नायर (२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. नायरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, त्याने कोणच्या मानसिक विंवचनेतून अचानक टोकाचे पाऊल उचलले याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, यानित्ताने बीट्स पिलानीत विद्यार्थांचे मानसिक आरोग्य आणि त्यासाठी मार्गदर्शन व अभ्यासक्रमाचा ताण याबाबत पुन्हा एकदा सवाल उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी प्रियान सिंग या विद्यार्थ्यांने डिसेंबर २०२४ मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये अर्थव देसाई, कृष्णा कसेरा (मे २०२५) आणि कुशाग्र जैन (ऑगस्ट २०२५) यांनी बीट्स पिलानी कॅम्पसमध्ये आत्महत्या करुन आयुष्य संपवलं आहे. यातील कृष्णा कसेरा यांच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

बीट्स पिलानी कॅम्पसमध्ये आत्महत्यांचे सत्र चिंता वाढवणारे आहे. तसेच, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना असा कोणता मानसिक ताण आहे ज्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतायेत याबाबत आता सवाल उपस्थित केला आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT