Goa Electric Vehicles Sale increase: गोव्यात ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. 2022-23 मध्ये राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत जवळपास 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात 9,206 ई -हने धावत आहेत. त्यात दुचाकी वाहनांचा वाटा जवळपास 82 टक्के आहे.
2021-22 मध्ये 1816 च्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात गोव्यात 7093 ई-वाहनांची विक्रमी खरेदी झाली. गेल्या आर्थिक वर्षात एकूण 6325 ईव्ही दुचाकी विकल्या गेल्या होत्या, 2021-22 मध्ये ही संख्या 1443 होती.
राज्यात आतापर्यंतच्या एकूण ईव्ही खरेदीत चारचाकी वाहनांचा वाटा केवळ 11 टक्के आहे. एकूण 1089 चारचाकी वाहनांपैकी 684 चारचाकी गेल्या आर्थिक वर्षात खरेदी केल्या होत्या.
राज्य सरकारच्या कदंब परिवहन महामंडळ लिमिटेड (KTCL) कडे 53 इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या आहेत. राज्याच्या रस्त्यावर 72 EV तीन चाकी आणि 11 EV मालवाहक गाड्या सध्या धावत आहेत.
सरकारच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये कार्बन उत्सर्जनात ऑटोमोबाईल उद्योगाचे योगदान सुमारे 42 टक्के होते जे 2050 पर्यंत 62 टक्क्यांपर्यंत वाढेल. यावर मात करण्यासाठी, ग्राहकांना ईव्ही खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी EV धोरण राज्यात लागू केले जाणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ईव्ही सबसिडी योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 25 कोटींची तरतूदही केली आहे.
राज्य सरकारच्या 'गोवा स्टेट एनर्जी व्हिजन 2050' च्या मसुद्यानुसार 2050 पर्यंत सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर किमान 75 टक्के, दुचाकी आणि टॅक्सींसाठी 100 टक्के आणि सेंट फेरी बोटीत किमान 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा राज्याचा मानस आहे.
तसेच 2030 पर्यंत सर्व डिझेल पंपांचे रूपांतर सौर पंपांमध्ये करण्याचा आणि ते 2050 पर्यंत इलेक्ट्रिक ग्रीडशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.