'अ‍ॅपल'चे सीईओ टिम कूक यांनी गोमंतकीय कलावंताची घेतली भेट; दिल्लीतील म्युरल्सचे तोंडभरून केले कौतूक

लोधी आर्ट डिस्ट्रिक्ट येथील कलाकृतींची जाणून घेतली प्रोसेस
Tim Cook Meets Dattaraj Naik
Tim Cook Meets Dattaraj Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

Tim Cook Praises Goan Mural Artist Dattaraj Naik: जगातील टॉपच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक गेल्या काही दिवसांत भारत दौऱ्यावर होते. निमित्त होते अ‍ॅपलच्या मुंबई आणि दिल्ली येथील अधिकृत स्टोअर्सचे उद्गाटन. या उद्घाटनांशिवाय कूक यांनी भारतातील काही सर्जनशील व्यक्तिमत्वांची भेटही घेतली. आणि त्यामध्ये गोव्याच्या एका युवकाचाही समावेश होता.

दत्तराज नाईक असे या गोमंतकीय युवकाचे नाव असून तो म्युरल आर्टिस्ट आहे. दत्तराज याने दिल्लीतील लोधी आर्ट डिस्ट्रिक्ट येथे त्याची काही म्युरल पेंटिंग्ज केली आहेत. त्याची टिम कूक यांनाही भूरळ पडली. त्यांनी दत्तराज याची भेट घेत त्याच्या कलाकृतींचे कौतूक केले.

Tim Cook Meets Dattaraj Naik
Pernem Crime News: पेडण्यात अनोळखी तरूणीचा निर्घृण खून; शीर धडावेगळे करत केले चार तुकडे...

लोधी आर्ट डिस्ट्रिक्ट हा भाग दिल्लीत कलावंतांसाठीचे खुले व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. दत्तराज याने 2019 मध्ये सेंट+आर्ट इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने एक भित्तीचित्र तयार केले होते. या कलाकृतीचे शीर्षक होते 'साथ साथ'. हीच कलाकृती लोधी आर्ट डिस्ट्रिक्ट येथे आहे.

कूक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दिल्लीतील लोधी आर्ट डिस्ट्रिक्ट ही एक उल्लेखनीय सार्वजनिक जागा आहे. येथे दत्तराज नाईक यांनी मला आयपॅडवर त्यांची म्युरल्स कशी डिझाईन केली जातात, याची माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे आभार. सेंट+आर्ट इंडिया फाऊंडेशनसह अनेक कलावंतांनी या म्युरल्समधून भारतीय जीवन इतक्या ताकदीने अप्रतिम टिपल्याबद्दल अभिनंदन.”

या भेटीबाबत एका इंग्रजी प्रसारमाध्यमाशी बोलताना दत्तराज नाईक याने सांगितले की, “मला Apple Inc. मधील एका व्यवस्थापकाचा फोन आला. त्याने मला सांगितले की, Apple मधील एका वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याला माझे 'साथ साथ' नावाचे एक भित्तिचित्र आवडले आहे.

त्याने मला मोठ्या प्रमाणात म्युरल्स तयार करण्याच्या कल्पनेबद्दल आणि प्रक्रियेबद्दल आणि प्रक्रियेत मी अ‍ॅपलची कोणतीही उपकरणे वापरतो का, याबद्दल काही प्रश्न विचारले. त्यानंतर, त्यांनी मला ते वरिष्ठ अधिकारी मला व्यक्तिशः भेटू इच्छितात आणि लोधी कॉलनी येथील कलाकृती कशी बनवली, याबद्दल त्यांना माहिती हवी आहे, असे सांगितले.

मला सुरूवातीला आपण कूक यांना भेटणार आहोत हे माहीत नव्हते कारण त्यांनी अधिकाऱ्याचे नाव उघड केले नव्हते. पण जेव्हा मला टिम कूक यांना भेटणार आहे, असे कळले तेव्हा मला आनंद झाला.

Tim Cook Meets Dattaraj Naik
Calangute Crime: आधी चोरले मोबाईल फोन; नंतर त्याच फोनमधील अनोळखी महिलांना कॉल करून द्यायचा त्रास...

मी स्वतः टेक एन्थुझियास्ट आहे आणि मला डिजिटल आर्टमध्ये आवड आहे. मी Apple च्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC), ऑनलाइन लॉन्च इव्हेंट्स आणि एकंदर डिझाइन सौंदर्यशास्त्राचे अनुसरण करत आलो आहे.

त्यामुळे टेक इंडस्ट्रितील ट्रिलियन डॉलरची उलाढाल असलेल्या कंपनीतील दिग्गज व्यक्ती असलेल्या टीम कुकला भेटणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.” कूक हे खूप शांत आहेत. त्यांना 'साथ साथ' कलाकृती आणि संपूर्ण लोधी आर्ट डिस्ट्रिक्टबद्दल जाणून घेण्यात खरोखरच रस होता. मी त्यांना अ‍ॅपल पेन्सिल आणि अ‍ॅपची कशी मदत घेतो ते सांगितले.

आयपॅडवर स्केच बनवण्यापासून ते दर्शकांना गुंतवून ठेवणाऱ्या प्रकल्पापर्यंतची कल्पना कशी विकसित झाली, याबद्दल अधिक जाणून घेण्यास ते उत्सुक होते. माझ्या सध्या सुरू असलेल्या काही प्रकल्पांवर त्यांच्याशी चर्चा केली.

त्यांनी माझ्या कामाचे तसेच सेंट+आर्ट इंडिया फाउंडेशनने देशभरात सुरू केलेल्या सार्वजनिक कला प्रकल्पांचे कौतुक केले, असेही नाईक याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com