Goa youth arrested in Gaya, Bihar Dainik Gomantak
गोवा

गोव्याचा ब्लफमास्टर! बिहारमध्ये बेल्जियमचा असल्याचे सांगून अनेकांना घातल्या टोप्या, पण प्लॅन बूमरँग झाला

पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली, त्यात सेबी डिसिल्वा एका स्थानिक व्यक्तीशी बोलताना दिसून आला.

Pramod Yadav

Gaya, Bihar: गोव्यातील एक तरुण परदेशी (बेल्जियमचा रहिवासी) असल्याचे भासवून लोकांकडून पैसे उकळत असे. त्याच्यासोबत भूतकाळात काही गुन्हेगारी घटन घडल्याचा हवाला देऊन तो लोकांची सहानुभूती मिळवायचा आणि नंतर त्यांच्याकडून पैसे मागायचा.

एवढेच नव्हे तर तो स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन तो विविध लोकांवर गुन्हा दाखल करायचा. दरम्यान, त्याचा हा प्लॅन त्याच्यावरच बूमरँग झाला.

(Goa youth arrested in Gaya, Bihar)

बिहारमधील गया पोलिसांनी 26 वर्षीय सेबी डिसिल्वा याला अटक केली आहे. सेबी डिसिल्वा उत्तर गोव्यातील मोरजीचा रहिवासी आहे.

गया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 03 च्या सुमारास तो सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आला. सेबीने पोलिस ठाण्यात इंग्‍लिश भाषेत संभाषणाला सुरूवात केली. तो बेल्जियमचा रहिवासी असून, 11 मार्च रोजी भारत भेटीसाठी गया शहरात आला होता. असे त्याने पोलिसांना सांगितले.

गया शहरातील बसस्थानकावर एकाने त्याला पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, धमकी देऊन मोबाईल, लॅपटॉप व विदेशी चलन 3,100 युरो लुटले. असेही त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता अशी काही घटना घडली नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पण, पोलीस पथकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.

पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली, त्यात सेबी डिसिल्वा एका स्थानिक व्यक्तीशी बोलताना दिसून आला. पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेत चौकशी केली.

दरम्यान, सेबी डिसिल्वा त्याला गांधी मैदान-एपीआर मॉलजवळ भेटला होता. तो गोव्याचा रहिवासी असून, त्याचे सामान ट्रेनमध्ये चोरीला गेले आहे. असे सेबीने त्याला सांगितले व त्या व्यक्तीने डिसिल्वाला 1,100 रुपयेही दिले. अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी पुन्हा डिसिल्वाची चौकशी केली पण, त्याने आपल्याला हिंदी बोलता येत नाही असे सांगत इंग्रजीत संवाद साधला. पण, पोलिसांनी आपला खाकी हिसका दाखवल्यानंतर तो हिंदीत बोलू लागला. तसेच, तो गोवा येथील रहिवासी असून, त्याने भारतातील अनेक राज्यात लोकांना टोप्या घातल्या असल्याची कबुली दिली.

दरम्यान, गया पोलिसांनी स्वत:ला विदेशी भासवणाऱ्या व लोकांना टोप्या घालणाऱ्या ब्लफमास्टरला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT