Goa Job Fraud Case
Goa Job Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Job Fraud Case: गोव्याच्या तरूणीला परदेशात बनवले मोलकरीण; चांगल्या नोकरीच्या आमिषाने फसवणूक

Akshay Nirmale

Goa Job Fraud Case: गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील एका तरूणीला परदेशात चांगली नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरूणीला बहारीन येथे नेण्यात आले. तिथे तिला जबरदस्तीने मोलकरीन म्हणून राबवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या पीडीत 23 वर्षीय तरूणीची मुंबई पोलिसांनी बहारीनमधून सुटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तिला भारतात आणले आहे.

तेजल रामा गवस असे या मुलीचे नाव आहे. ती मूळची गोव्याची आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती परदेशात नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी तिने काही दलालांची मदत घेतली. एजंटनी तिला बहारीनमध्ये चांगली नोकरी असल्याचे सांगितले. एका एजंटसोबत 17 फेब्रुवारीला तेजल बहारीनला गेली होती.

एजंटने तिला एका स्थानिक कुटुंबाच्या घरी ठेवले. तिला या लोकांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करावे लागेल, असे बजावण्यात आले. तेजलने विरोध केल्यावर तिचा पासपोर्ट आणि मोबाईल काढून घेतला गेला.

त्यानंतर त्यांचे म्हणणे न ऐकल्यास चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी तिला देण्यात आली. तेजलला तिथे मोलकरणीचे काम करण्यास भाग पाडले गेले.

मात्र एके दिवशी संधी मिळताच तिने आपल्या एका नातेवाईकाला याबाबत माहिती दिली. संबंधित नातेवाईकाने 14 मार्च रोजी मुंबई पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने बहारीनमधील एजंटशी संपर्क साधून भारतीय दूतावासाच्या मदतीने मुलीची सुटका केली. सुरवातीला तिला दिल्लीत आणि तिथून गोव्यात सुखरूप आणण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT