Panaji Air Quality: पणजीकरांसाठी धोक्याचा इशारा! हवेची गुणवत्ता खालावली; जाणून घ्या कारण...

जानेवारी ते मार्च याकाळात एकही दिवस हवा 'चांगली' नव्हती
Panaji Air Quality
Panaji Air QualityDainik Gomantak

Panaji Air Quality: गोव्याची राजधानी पणजीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे पणजीतील रहिवाशांना आता आरोग्याबाबत अधिक दक्ष राहावे लागणार आहे.

गेल्या तीन महिन्यात अनेक वेळा पणजी शहरातील हवेत इनहेलेबल पार्टिक्युलेट मॅटर (PM10) चे प्रमाण उच्च असल्याचे समोर आले आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार पणजीतील हवेची गुणवत्ता 'चांगली आणि समाधानकारक' या श्रेणीतून आता 'समाधानकारक आणि मध्यम' या श्रेणीत घसरली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (GSPCB) हवाल्याने याबाबत इंग्रजी प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे.

Panaji Air Quality
Shripad Naik: भाजपमधीलच काहीजणांकडून मला डावलण्याचा प्रयत्न; पण उत्तर गोव्यातून मीच उमेदवार...

हवेची गुणवत्ता आरोग्यदृष्ट्या संवेदनशील असलेल्या लोकांना, आजारी लोकांना, लहान मुले आणि फुफ्फुस आणि हृदयाचे आजार असलेल्या वृद्धांना धोकादायक ठरू शकते.

हवा प्रदुषणामुळे श्वसन समस्या, अॅलर्जी आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवतात.

GSPCB च्या नोंदीनुसार या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये शहरातील PM10 अशी पातळी होती.

ती गेल्या वर्षीच्या याच कालावधीत नोंदवलेल्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त आहे. जानेवारी ते मार्च या काळात पणजीत एकही दिवस 'चांगली' हवेचा दर्जा नव्हता, असेही या नोंदींमध्ये म्हटले आहे.

पणजीतील हवेत दहा मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाचे (मानवी केसांच्या रुंदीच्या पाचव्या भागाचे) इनहेलेबल पार्टिक्युलेट मॅटर (PM10) जास्त आढळून आले.

तीन महिन्यांत एकूण 23 दिवस निरीक्षण केले गेले. त्यातील 12 दिवस हवेची गुणवत्ता ''समाधानकारक आणि मध्यम' नोंदवली गेली, त्याचा लोकांच्या आरोग्याला धोका संभवतो.

Panaji Air Quality
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील दरांत घट, दक्षिण गोव्यातील दर स्थिर; जाणून घ्या आजचे दर...

या कारणांमुळे हवा खराब

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे, रस्त्यांचे खोदकाम, इमारती पाडणे, आग, वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण यामुळे पीएम १० च्या पातळीत वाढ झाली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी तातडीने पावले उचला, असे महापालिकेला सांगितला आहे.

पार्टिक्युलेट मॅटरने जानेवारीमध्ये दोनदा पातळी ओलांडली. ती 107 g/m3 आणि 133 g/m3 नोंदली गेली. फेब्रुवारीमध्ये PM10 चे सर्वाधिक प्रमाण असलेले दिवस पाहिले गेले. नऊ निरीक्षण दिवसांपैकी, सहा दिवसांची पातळी 113 g/m3 आणि 158 g/m3 दरम्यान होती.

मार्चमध्ये पातळी 120 g/m3 दर्शविली, जी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com