Bollywood Film Festival Norway Dainik Gomantak
गोवा

अभिमानास्पद! गोव्यातील लेखक प्रकाश पर्येकर यांच्या 'आर्या' चित्रपटची नॉर्वे मोहोत्सवासाठी निवड

स्वातंत्र्यदिनी ह्या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला असून तो सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील सत्तरीचे सुपुत्र नामवंत लेखक कथाकार डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या ‘सैम सोबित नेहा’ या कोंकणी कथेवर आधारित ‘आर्या-डॉटर ऑफ भारत’ ह्या मराठी चित्रपटाची नॉर्वे येथील बॉलीवुड चित्रपट मोहोत्सवासाठी निवड झाली आहे.

स्वातंत्र्यदिनी ह्या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला असून तो सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. ‘एसएस’फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत,पुणे येथील शरद आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन भास्कर यांनी दिग्दर्शन केले आहे.

ग्रामीण जीवन आणि लोकसंस्कृतीचे दर्शन या चित्रपटातून होते. विरभद्र, रणमाले, शिगमोत्सव, चोरोत्सव, रोमटामेळ आदि लोककलांचाही समावेश केला आहे. 22 दिवसांच्या या चित्रीकरणात सत्तरीतील रिवे, गोळावली, पाली, ठाणे, धावे, तार तसेच जुने गोवे, ताळगाव, दोनपावला, पणजी या भागात चित्रीकरण झाले आहे.

गोमंतकीय कलाकारांचा चित्रपटात सहभाग:

या चित्रपटात ‘आर्या’ या लहान मुलीची भूमिका हिरिका पाटील (पुणे), आईची भूमिका अभिनेत्री अमृता फडके, मुंबईचे राहुल बोडस (वडील), शीतल सोनावणे, शुभांगी दामले, शयशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दरम्यान श्वेता कर्पे, माधुर्य मोरजकर, कविष बेतकीकर, अदिती कुंभार, सानवी माशेलकर, श्रुष्टी गांवकर, वेदा देसाई, मेघा हळदणकर, श्वेता गडकर, विवेक शिरवईकर, नविता गावस, विश्वनाथ गावस या गोमंतकीय कलाकारांची झलक पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाची पटकथा डॉ. प्रकाश पर्येकर आणि श्रीकांत भिडे यांची असून, संवाद आणि गीत पर्येकर यांनीच लिहिले आहेत. गोव्याची नांमवंत गायिका सोनिया सिरसाट यांनी फादो शैलीत गाणे गाइले आहे.

वडाच्या झाडाचे महत्व अधोरेखित करणारी इंग्रजी कवितेचे लेखन अदिती बर्वे यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT