Sunburn 2023 Goa: 'आमकां नाका सनबर्न' पेडणे गावकऱ्यांचे सरपंचांना पत्र

पेडण्यातील नागरिकांनी मोपा येथे होणाऱ्या सनबर्नला विरोध दर्शवला आहे.
Sunburn 2023 Goa | Sunburn EDM Festival
Sunburn 2023 Goa | Sunburn EDM FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Pernem resident oppose Sunburn 2023 at Mopa Goa: यावर्षीचा सनबर्न 2023 संगीत महोत्सव उत्तर गोव्यातील मोपा येथे होणार असल्याचा प्रस्ताव मंजूरीच्या अंतिम टप्यात असल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात हा महोत्सव होण्याची शक्यता अधिक आहे.

पेडण्यातील नागरिकांनी मोपा येथे होणाऱ्या सनबर्नला विरोध दर्शवला आहे. पेडणेवासियांनी याबाबत सरपंचांना पत्र लिहले असून, महोत्सवला परवानगी न देण्याची मागणी केली आहे.

'दरवर्षी गोव्यातील सनबर्न विविध भागात होत आला आहे. महोत्सवादरम्यान मद्य, अमली पदार्थ यासह विविध गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या.'

'आपला भाग अतिशय शांत परिसर म्हणून ओळखला जातो. येथील युवक अशा गैर कृत्यांपासून दूर आहेत. त्यामुळे मोपा येथे होणाऱ्या सनबर्न महोत्सवाला विरोध करावा. तसेच, त्याच्या आयोजनासाठी परवानगी देऊ नये.' अशा आशयाचे पत्र गावकऱ्यांनी सरपंचांना दिले आहे.

Sunburn 2023 Goa | Sunburn EDM Festival
गोवा कॅबिनेट मंत्र्याचा सेक्स स्कँडल, अपहरणात समावेश? पंच महिलेशी चाळे, चोडणकरांनी शेअर केली खळबळजनक बातमी

सनबर्नबाबत मायकल लोबो काय म्हणाले?

गोव्यात होणार सनबर्न समुद्रकिनारी पट्यात व्हायचा. सुरूवातीला तो कांदोळी, हणजुणे, वागातोर, शापोरा येथे होत असे आता तो मोपा येथे हालविण्याची तयारी सुरू आहे. पण, तिथे हॉटेल, रेस्टॉरंट, गेस्ट हाऊस याची सोय कुठे आहे.

अशाच प्रकारे पुण्यात आयोजित केलेला सनबर्न, आयोजकांसाठी तोट्याचा ठरला होता. असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले. लंडनमध्ये अशा प्रकारच्या महोत्सवात सरकारचा थेट सहभाग पाहयला मिळतो. तेथील सरकार थेट फी आणि कर घेते. सरकारला त्यातून भरपूर पैसा मिळतो आपण हे स्विकारायला का तयार नाही. असा सवाल लोबो यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com