BCCI Joint Secretary Rohan Dessai
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (Board of Control for Cricket in India) संयुक्त सचिवपदी गोव्यातील रोहन देसाई यांची आज (१ मार्च) निवड करण्यात आली आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनसाठी ही गौरवाची बाब आहे. रोहन देसाई सध्या गोवा क्रिकेट असोसिएशनचेही सचिव पद भूषवत आहेत.
बीसीसीआयचे माजी संयुक्त सचिव देवजित सैकिया यांना सचिवपदी बढती देण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. त्या रिक्त पदासाठी नव्या सचिवांची निवड करण्यासाठी बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते.
याच सभेत रोहन देसाई यांच्या नावाची निवड करण्यात आली. रोहन देसाई यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड होणं, ही गोवा क्रिकेटसाठी मोठं यश मानलं जात आहे.
क्रिकेट क्षेत्रात गोव्याची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी आणि स्थानिक क्रिकेट खेळाडूंना अधिक संधी मिळवून देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे.
गोवा क्रिकेट असोसिएशनचे (Goa Cricket Association) सचिव रोहन देसाई यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चार सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रोहन देसाई यांची भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
रोहन देसाई यांच्या नेतृत्वाखाली, गोवा क्रिकेट असोसिएशनने स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्याचं कार्य केलं आहे. सुयश प्रभुदेसाईची दुलीप करंडक स्पर्धेसाठी निवड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
सध्या, भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी (कर्नाटक) हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत, तर राजीव शुक्ला (उत्तर प्रदेश) हे उपाध्यक्ष आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.