Goa Carnival: कार्निव्हलचा जल्लोष! गोव्याच्या परंपरेचे, पूर्व-पाश्चात्य संस्कृतीच्या मिश्रणाचे होणार दर्शन

Goa Viva Carnival 2025: कार्निव्हलचे वैशिष्ट्य म्हणजे चित्ररथांची परेड आटोपल्यानंतर लोकांना रिझवण्यासाठी इतरही पर्याय खुले असतात. अनेकजण जवळच असलेल्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावरच्या मोकळ्या हवेचा आनंद घेतात.‌
Goa Carnival Updates
Goa CarnivalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Panaji Carnival 2025

पणजी: पणजीतील रस्त्यांची स्थिती कशीही असली तरी शहरातील एक रस्ता मात्र आज चैतन्याने सळसळून येणार आहे. कार्निव्हलची रंगबिरंगी सुरुवात करून देणारा दयानंद बांदोडकर मार्ग, सुंदर झुलत्या शरीरांचे बेहोष जडजवाहीर अंगावर घेऊन, सांता मोनिका जेटी ते कला अकादमीपर्यंत आज संध्याकाळी मनमुक्तपणे लखलखणार आहे.‌ तुम्ही जर आज पणजीत असाल तर योग्य स्थानी आहात.. जर नसाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. 

वर्षाचा हा एक असा दिवस असतो (यंदा एक मार्च) जेव्हा राजधानीचे हे शहर प्रत्येक कोपऱ्यात जिवंत भासते. शहरातील फ्लोट परेड ही एक गोष्ट झाली मात्र मिरामार येथील किनाऱ्यावर, शहरातील चौकांमध्ये, बार-रेस्टॉरंट्समध्ये कार्निव्हलचे चमकदार आणि आनंदी प्रतिध्वनी पुढील चार दिवस उमटताना दिसतील. 

दुपारी ३ वाजता मांडवी पुलाखालील दिवजा सर्कलकडून फ्लॉट्स (चित्ररथ) निघतील.‌ त्यानंतर ४ वाजता जुन्या सचिवालयाजवळ किंग मोमो आपला पारंपरिक संदेश वाचून  गोव्यातील यंदाच्या कार्निव्हलला सुरुवात झाल्याचे जाहीर करेल.

Goa Carnival Updates
Full Guide To Goa Carnival 2025: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्निव्हलसाठी गोवा सज्ज; कसे पोहोचाल? काय पाहाल? संपूर्ण माहिती

'खा, प्या मजा करा' या संदेशाबरोबरच 'गोव्यातील धार्मिक सलोखा टिकवा' अशी हाक यंदा किंग मोमो देणार आहे. त्यानंतर सुरू झालेल्या चित्ररथांच्या परेडमध्ये गोव्याच्या परंपरेचे, पूर्व-पाश्चात्य संस्कृतीच्या मिश्रणाचे नयनरम्य दर्शन तिथे उपस्थितांना होत राहील. 

गोव्याच्या इतर शहरांतही उद्यापासून कार्निव्हलची धूमधाम सुरू होईल मात्र पणजी शहरातील कार्निव्हलचे वैशिष्ट्य म्हणजे चित्ररथांची परेड आटोपल्यानंतर लोकांना रिझवण्यासाठी इतरही पर्याय खुले असतात. अनेकजण जवळच असलेल्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावरच्या मोकळ्या हवेचा आनंद घेतात.‌

Goa Carnival Updates
"Viva Carnival" Song : रंग, संगीत आणि जल्लोष! 'व्हिवा कार्निव्हल' या गाण्याने गोव्यात उसळली आनंदाची लाट

कार्निव्हलचे रंग मग तिथेही पसरतात. त्याशिवाय शहरातील सांबा स्क्वेअरमध्ये एका वेगळ्या जल्लोषाची सुरुवात लगेच होणारच असते. लोकांची पावले त्या दिशेलाही वळतात. तिथले संगीत, खाद्यपदार्थ आणि तिथला उत्साह रात्री उशिरापर्यंत कार्निव्हलचे चैतन्य अबाधित ठेवते. या ठिकाणी लोकप्रिय बँड आणि डीजेंच्या संगीतावर पाय थिरकत राहतात.

यंदा चर्चच्यासमोर असलेली सांबा-स्क्वेअरची जागा बदलून ती जुनी नगरपालिकेच्या इमारतीच्या मोकळ्या जागेत आणण्यात आली आहे. सांबा स्क्वेअरमध्ये आज सुरू होणारा हा जल्लोष ४ मार्चपर्यंत चालणार आहे. चार मार्चच्या शेवटच्या 'रेड अँड  ब्लॅक' रजनीची (लाल आणि काळ्या पोशाखाची संगती या रात्री अनिवार्य असते) वाट तर अनेक जण पाहत असतील.  ‘ट्रिलॉजी’ आणि ‘ब्लू  वेव्ह’  हे लोकप्रिय बँड शेवटच्या रात्री आपले संगीत सादर करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com