Goan people will get booster dose from Monday Dainik Gomantak
गोवा

सोमवारपासून गोमंतकीयांना मिळणार बुस्टर डोस

राज्य व केंद्र सरकार लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन करत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. ओमिक्रॉन बंधितांच्या संख्येत होणारी वाढ राज्यासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. राज्य व केंद्र सरकार लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, सरकारने राज्यातील आरोग्य कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाच्या (Coronavirus) बुस्टर डोसची व्यवस्था केली आहे. सोमवारपासून सर्व आरोग्य केंद्र आणि गोवा (Goa) मेडिकल कॉलेज येथे बुस्टर डोसचे लसीकरण (Vaccination) सुरू होणार आहे. (Goan people will get booster dose from Monday)

राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जवळपास 28,000 लोक बुस्टर डोससाठी पात्र आहेत; उद्यापासून सर्व आरोग्य केंद्र आणि गोवा मेडिकल कॉलेज येथे लसीकरण सुरू होईल, दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले लोक बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत. यासाठी कोणतीही पुर्वनोंदणी अनिवार्य नाही.

राज्य सरकारने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसिकरणाला सुरुवात झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT