Yuri Alemao Press Conference Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: ..हा तर दुसरीकडे लक्ष वळवण्याचा 'भाजपचा' प्रयत्न! वेलिंगकर प्रकरणावरून आलेमाव यांचे आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao On Subhash Velingkar Controversial Statement About St Xavier DNA Test

पणजी: गोव्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी वापरू पाहत असलेली आरएसएस आणि भाजपची ‘ब्लूप्रिंट’ गोमंतकियांनी हाणून पाडली आहे. येथील बंधुभाव कायम असून मणिपूरसारखी परिस्थिती येथे निर्माण होऊ देणार नाही. ही परिस्थिती शांततेने हाताळल्याबद्दल आणि जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांविरोधात एकजूट दाखवल्याबद्दल हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन अशा सर्व गोमंतकीयांचे आभार, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जनतेने राज्यात शांतता व एकजूट राखावी, जेणेकरून आमची एकता कोणीही तोडू शकणार नाही. भ्रष्टाचार, जमीन रूपांतरण, म्हादई या विषयांकडून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, हे सर्वांना कळून चुकले आहे. या सर्व कारणांमुळे भाजपने आपला जनाधार गमावला आहे व याची जाणीव भाजपला आहे म्हणूनच ते धमकावण्याचे डावपेच आणि जातीय चिथावणी देत आहेत, असा आरोप आलेमाव यांनी केला.

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा वापर भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी करत आहे. पण गोव्‍यात त्यांना यश प्राप्त झालेले नाही आणि यापुढेही मिळणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: परप्रांतीयांचा मुद्दा तापणार; मुख्यमंत्री सावंतांनी थेटच सांगितलं, 'प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी'

Automated vacuum Sewer: आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापन करणारे गोवा ठरले पहिले राज्य!

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

गोव्यात येऊन 'काहीही' करून चालणार नाही! पर्यटकांनी निसर्ग पाहावा, संस्कृती समजून घ्यावी; संपादकीय

SCROLL FOR NEXT