Goa Illegal Fishing Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Fishing: मत्स्योद्योग व्‍यवसाय संकटात! परप्रांतीय टॉलर्सचा राज्यात हैदोस; बुल ट्रॉलिंग, एलईडीद्वारे मासेमारी

Illegal Fishing: गोव्‍यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या मासेमारी बोटींकडून सर्रास एलईडी दिव्‍यांचा वापर करुन मासेमारी केली जात आहे.

Manish Jadhav

मडगाव: गोव्‍यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या मासेमारी बोटींकडून सर्रास एलईडी दिव्‍यांचा वापर करुन मासेमारी केली जात आहे. तसेच, बेकायदेशीर असलेली बुल ट्रॉलिंग मासेमारीही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्‍यामुळे गोव्‍यातील मच्‍छीमारांच्‍या तोंडचे पाणी पळाले आहे. शिवाय, व्‍यवसाय संकटात सापडला आहे.

बेकायदेशीर घुसखोरी!

दरम्यान, काल (4 नोव्हेंबर) कर्नाटकातून आलेल्‍या दोन बोटींनी गोव्‍याच्‍या सागरी हद्दीत घुसून बेकायदेशीर मासेमारी केल्‍यामुळे किनारपट्टी पोलिसांनी कारवाई करुन त्‍या जप्‍त केल्‍या. यापूर्वी, बाणावली, कोलवा आणि पाळोळे येथेही अशा प्रकारे कारवाई केली करण्‍यात आली होती. असे असले तरी ही कारवाई केवळ डोळ्‍यांना पाणी लावण्‍यापुरतीच असल्‍याची भावना गोव्‍यातील मच्‍छीमारांमध्‍ये निर्माण झाली आहे.

मासेमारी प्रमुख व्यवसाय

मासेमारी हा राज्यातील एक प्रमुख व्यवसाय आहे. अनेक मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. अलीकडे काही मच्छीमार यांत्रिक मासेमारी करु लागले आहेत. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मासेमारी करणारे ट्रॉलर्स गोव्याच्या समुद्राच्या घुसून मोठ्या प्रमाणात एलईडी आणि बुल ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करतात आणि ती मासळी आपल्या राज्यात घेऊन जातात. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या हाती काहीच लागत नाही, असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.

माशांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती: सिमॉईश

राज्‍यात बेसुमार बेकायदेशीर मासेमारी सुरु आहे, पण ती रोखण्यासाठी सरकारकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत अशी संतप्‍त प्रतिक्रिया बेतुल आणि असोळणा या परिसरातील मच्छीमारांनी व्‍यक्‍त केली. समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने मत्स्य विभागाच्या हेतूवरच त्‍यांनी प्रश्‍‍नचिन्ह उपस्‍थित केले. समुद्रात अशा प्रकारे प्रतिबंधित मासेमारी सुरु राहिल्यास काही माशांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती मच्छीमारांचे नेते ओलेन्‍सियो सिमॉईश यांनी व्यक्त केली.

माशांच्या प्रजाती नष्ट होतील

बेकायदा मासेमारी करणाऱ्या या बोटींवर मत्स्य विभागाकडून कडक कारवाई केली जात नाही. गोव्याच्या (Goa) समुद्रात बुल ट्रॉलिंग आणि एलईडी मासेमारी सुरु राहिल्यास अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होतील. गोव्याच्या समुद्रात बाहेरील ट्रॉलर्सकडून होणाऱ्या अनिर्बंध मासेमारीमुळे सागरी परिसंस्था बिघडली आहे. त्यामुळे मासळीची उपलब्धता कमी होत असून, ती दिवसेंदिवस महाग होत चालली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT