Illegal Fishing Goa: गोव्याच्या हद्दीत गुजरात आणि कर्नाटकच्या बोटी; मासेमारीसाठी घुसखोरी

बेकायदेशीरपणे मासेमारी करणार्‍यांकडे मत्स्य विभाग दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप.
Fishing Boat
Fishing BoatDainik Gomantak

Illegal Fishing Goa: गोव्याच्या हद्दीत गुजरात आणि कर्नाटकातील बोटी मासेमारीसाठी घुसखोरी करत असल्याचा आरोप, 'गोयंचो रापनकारांचो एकवटो' चे सरचिटणीस ओलेन्सियो सिमोस यांनी केला.

बेकायदेशीरपणे मासेमारी करणार्‍यांकडे मत्स्य विभाग दुर्लेक्ष करत आहे. तसेच, गेल्या दोन आठवड्यांपासून शेजारी राज्यांतील बोटी गोव्यातील दर्यात घुसखोरी करत असल्याचा आरोप सिमोस यांनी केला.

परराज्यातील मासेमारी बोटी बेदरकारपणे गोवा हद्दीत संचार करत असून, मत्स्य खाते याकडे दुर्लेक्ष करत आहे. घुसखोरी करणारे लोक गोव्यातील मासेमारी व्यावसायिकांवर दमदाटी करत असून, त्यांच्या मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळींचे नुकसान करत आहेत.

अशापद्धतीने घुसखोरी केल्यास पारंपरिक मासेमारी करणारे व्यावसायिक कसे उदरनिर्वाह करणार असा, प्रश्न कामिलो सोसा यांनी उपस्थित केला आहे.

बेकायदेशीरपणे होणाऱ्या मासेमारीकडे विभागाने कानाडोळा केल्यास भविष्यात राज्यात एलईडी लाईट वापरून मासेमारी करण्यास पारंपरिक व्यावसायिक प्रवृत्त होतील अशी भीती सोसा यांनी व्यक्त केली.

अशापद्धतीच्या घुसखोरीला वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे सोसा यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com