Goa Taxi Operators Dainik Gomantak
गोवा

Goa: गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये तुंबळ हाणामारी, आमदाराच्या घरासमोरच राडा

Goa News: पेडण्यातील गोवा माईल्स काही टॅक्सी चालक आमदार प्रवीण आर्लेकरांसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते.

Pramod Yadav

गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमधील वाद शिगेला गेला असून, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या घरासमोरच राडा झाला. भाडे आकारणीवरुन दोन्ही गटांमध्ये शाब्दीक चकमक झाली व त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार, पेडण्यातील गोवा माईल्स काही टॅक्सी चालक आमदार प्रवीण आर्लेकरांसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी स्थानिक टॅक्सी चालक देखील आर्लेकरांच्या निवासस्थानी दाखल झाले.

यानंतर दोन्ही गटांमध्ये शाब्दीक चकमक झाली. शाब्दीक वादाचा नंतर हाणामरीत रुपांतर झाले. यात काहीजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

आमदार आर्लेकरांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही गटातील आक्रमक झालेले चालक शांत झाले व भाडे आकारणीच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन आर्लेकरांनी दिले.

समान भाडे आकारणी व्हावी

स्थानिक टॅक्सीच्या तुलनेत गोवा माईल्सचे भाडे कमी आहे, गोवा माईल्स मोबाईल अॅपबेस सुविधा आहे. दोघांनीही समानभाडे आकारणी करावी. मी नेहमीच स्थानिक टॅक्सी चालकांसोबत असल्याचे आर्लेकर यावेळी म्हणाले.

का होतोय दोन्ही गटात वाद?

कदंब महामंडळाचे काही कर्मचारी गोवा माईल्स सहकार्य करत असल्याचा आरोप स्थानिक टॅक्सी चालकांनी केला. हा वाद दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही गटातील चालक आर्लेकरांच्या निवासस्थानी गेले होते. अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: 'मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी बोलतोय'! तोतया ऑफिसरने साधला डाव; कॅफेमालकाला घातला 9 लाखांचा गंडा

Goa News: झेडपी सदस्‍यांना लवकरच मोठी जबाबदारी! पंचायतमंत्री गुदिन्‍होंनी दिली माहिती; पणजीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Rashi Bhavishya: शुभकाळ! सर्व इच्छा पूर्ण होणार, थोडी सावधगिरी बाळगा; 'या' राशींचे बदलणार दिवस

Mankurad Mango: आंब्यांच्या ‘राजा’ आला रे! माणकुराद, हापूस बाजारात विक्रीसाठी; काय आहेत दर? जाणून घ्या..

Goa Politics: खरी कुजबुज; गोमंतकीय विद्यार्थी सुशेगाद

SCROLL FOR NEXT