Viriato Fernandes: खासदार विरियोतांनी घेतली पूरग्रस्तांची भेट; बोगमाळो येथे मलेरिया आणि डेंग्यूचा धोका!

South Goa MP Viriato Fernandes In Bogmalo: दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काल मंगळवारी बोगमाळो येथील पूरग्रस्त कुटुंबाची भेट घेतली.
Viriato Fernandes: खासदार विरियोतांनी घेतली पूरग्रस्तांची भेट; बोगमाळो येथे मलेरिया आणि डेंग्यूचा धोका!
South Goa MP Viriato Fernandes met the flood victims of bogmaloDainik Gomantak

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काल मंगळवारी बोगमाळो येथील पूरग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. तसेच नियोजनाच्या अभावामुळे या भागात आपत्ती ओढवल्याचा आरोप केला.

सध्याच्या परिस्थितीमुळे बोगमाळो येथे मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांना जन्म होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य गोपी नाईक उपस्‍थित होते.

Viriato Fernandes: खासदार विरियोतांनी घेतली पूरग्रस्तांची भेट; बोगमाळो येथे मलेरिया आणि डेंग्यूचा धोका!
Viriato Fernandes: दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो आसगाव प्रकरणी संसदेत उठवणार आवाज

खासदार फर्नांडिस यांनी सांगितले की, घरांमध्‍ये पाणी शिरणे ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा निचरा होत नसल्‍यामुळे ही समस्‍या निर्माण झाली आहे. लोकांचा जीव धोक्यात आला आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर न झाल्‍यास ते डासांच्या उत्पत्तीसाठी एक मैदान ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com