Flight To Mumbai Cancelled: गोव्यातून मुंबईला जाणारे विमान अचानक रद्द केल्याने विमान कंपनी आणि प्रवासी यांच्यात गोवा विमानतळावर मोठा वाद झाला. याचा एक व्हिडिओ समोर आला असून, यात विमान कंपनीचे कर्मचारी आणि प्रवासी वाद घालताना दिसत आहेत.
गोएअर कंपनीचे विमान गोव्याहून पहाटे 2:10 वाजता मुंबईला निघणार होते, परंतु प्रवाशांना सकाळी 2 वाजता उड्डाण रद्द झाल्याची माहिती मिळाली.
(GoAir Passengers Create Ruckus At Goa Airport As Flight To Mumbai Cancelled)
कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अचानक फ्लाईट रद्द केल्याने प्रवसी संतापले. आणि कंपनीच्या कर्माचाऱ्यांसोबत विमानतळावरच वाद सुरू झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले असून, विमान रद्द झाल्यामुळे 80 हून अधिक प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते.
या व्हिडिओमध्ये प्रवासी यांनी कर्मचारी यांच्यात मोठा शाब्दिक होताना दिसत असून, सर्वच प्रवासी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर हे प्रकरण हातापायीवर देखील आले होते, दरम्यान, कंपनी कर्मचाऱ्याने तेथून पळ काढला.
प्रवासी विमान कंपनीला दुसरे विमानाची सोय करून देण्याची विनंती करत आहेत. न झाल्यास दुसऱ्या विमानाची सोय होईपर्यंत हॉटेल बुक करून देण्याचीही विनंती प्रवासी करताना दिसत आहेत. दरम्यान, फ्लाईट अचानक रद्द झाल्याने प्रवासी आणि कर्मचारी यांच्यातील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कंपनीचे स्पष्टिकरण
गोव्यातून मुंबईला जाणारी G8 3 (GoFirst FLIGHT G8 380, Mumbai To Goa) फ्लाईट अचानक रद्द करण्याचे कारण विमान कंपनीने सांगितले आहे. 'गोव्यात उतरत असताना फ्लाईटला पक्षी धडकल्याने विमानाच्या पंख्याचे नुकसान झाले त्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आले. दरम्यान, मुंबईसाठी विमान उड्डाणाची सुधारीत वेळ जाहीर करण्यात आली.' असे स्पष्टिकरण कंपनीने दिले आहे.
दरम्यान, कंपनकडून पहाटे 6:30 वाजता दुसऱ्या विमानाची सोय केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.