Panaji Agriculture : ‘गोवाकॅन’ या बिगर सरकारी संस्थेने कृषी संचालकांना पत्र पाठवून जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात कुठ्ठाळी येथे क्षेत्रीय कृषी कार्यालयाचे उद्घाटन लवकर करावे. जेणेकरून शेतकरी आणि ग्राहकांना त्याचा किमान येत्या 6 महिन्यांत तरी लाभ देखील घेता येईल,असे म्हटले आहे.
नेव्हिल अल्फोन्सो संचालक कृषी यांना लिहिलेल्या पत्रात, ‘गोवाकॅन’ने म्हटले आहे, की हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार लवकरच मॉन्सून गोव्यात उतरेल आणि त्यामुळे हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करणे योग्य ठरेल.
मुरगाव तालुक्यातील लोकांच्या सेवेसाठी कृषी खात्याचे अधिकारी उपलब्ध असतील. संस्थेने पुढे म्हटले आहे की संचालनालयाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांचा लाभ मुरगावच्या शेतकरी आणि ग्राहकांना घ्यायचा आहे, परंतु त्यांच्या लाभासाठी त्यांना मडगाव कृषी कार्यालयात जावे लागते. याही वर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना मडगाव कृषी कार्यालयाला जावे लागले तर त्यांच्या दुरवस्थेची कल्पना करता येणार नाही.
‘गोवा कॅन’ने 3 जून 2020 रोजी कृषी संचालकांना पत्र लिहिले होते, की मुरगाव तालुक्यात पूर्ण विकसित क्षेत्रीय कृषी कार्यालय नाही आणि शेतकरी आणि ग्राहकांना संचालनालयाच्या सर्व योजनांसाठी मडगावला जावे लागते. सासष्टीतील कृषी अधिकारी अजूनही मुरगाव तालुक्याचा अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत.
‘गोवाकॅन’ने ही वस्तुस्थिती अधोरेखित केल्यानंतर, संचालक आणि त्यांच्या समूहाने, खर्च, कर्मचारी, आवश्यक जागा इत्यादीसाठी आवश्यक मंजुरीसाठी आवश्यक प्रस्ताव गोवा सरकारकडे पाठवला होता.
प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार
‘गोवाकॅन’ने कृषी संचालकांना लिहीलेल्या पत्राच्या प्रती मुख्य सचिव आणि कृषी व ग्राहक व्यवहार सचिव, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, पंचायत संचालक, नगर प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, मुख्य महाव्यवस्थापक नाबार्ड गोवा प्रादेशिक कार्यालय, उपसंचालक जिल्हाधिकारी, मामलतदार व गटविकास अधिकारी मुरगाव तालुका यांना पाठवण्यात आल्या आहेत. नुकताच दै.‘गोमन्तक’ने हा विषय प्रकाशात आणला होता. त्यावेळी कृषी खात्याचे संचालक नेव्हिल अल्फान्सो यांनी जूनमध्ये कुठ्ठाळी येथे नवे क्षेत्रीय कृषी कार्यालय उघडण्याविषयीची माहिती दिली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.