Manikrao Thakre Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सांताक्रुझ, शिरोडा, हणजूणवरून अडले युतीचे घोडे! ठाकरेंची सरदेसाई, परब यांसोबत बैठक; काय होणार घोषणा? राज्याचे लक्ष

Goa ZP Election: सांताक्रुझ, शिरोडा आणि हणजुण या तीन मतदारसंघांवरूनच काँग्रेस आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍समधील (आरजीपी) युतीचे घोडे अडले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सांताक्रुझ, शिरोडा आणि हणजुण या तीन मतदारसंघांवरूनच काँग्रेस आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍समधील (आरजीपी) युतीचे घोडे अडले आहे.

काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी शनिवारच्‍या बैठकीत आरजीपी अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्‍याशी चर्चा केली. परंतु, युतीबाबतचा अंतिम निर्णय रविवारीच घेण्‍यात येईल, असे ठाकरे आणि परब या दोघांनीही पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले. दुसरीकडे, गोवा फॉरवर्डच्‍या युतीवर काँग्रेसने शनिवारच्‍या बैठकीत शिक्‍कामोर्तब केले आहे.

भाजपला पराभूत करण्‍यासाठी जिल्‍हा पंचायत निवडणुकीत युती करण्‍याचा निर्णय काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी काही महिन्‍यांपूर्वी घेतला होता. त्‍याबाबत त्‍यांच्‍यात बैठकाही सुरू होत्‍या. युतीचा फैसला झाल्‍यानंतर जागा वाटपाबाबत मात्र काँग्रेस आणि आरजीपीमध्‍ये सांताक्रुज, शिरोडा आणि हणजुणे या तीन जागांवर अनेक दिवस अडले.

त्‍यात गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या दोन्‍ही पक्षांनी शिरोड्यावर दावा केलेला होता. परंतु, काँग्रेसला ते मान्‍य नसल्‍याने जागा वाटपाचा तिढा आणखी वाढला होता.

अशा स्‍थितीत काँग्रेसने गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला कल्‍पना न देताच अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्‍यामुळे आरजीपीच्‍या नेत्‍यांनी संताप व्‍यक्त केला आणि पक्षाच्‍या कोअर समितीची बैठक घेत बारा उमेदवारांची यादी जाहीर केली.

परंतु, त्‍यात जागा वाटपात मिळालेल्‍या जागांवरच उमेदवार दिले. त्‍यानंतर काँग्रेसने पुन्‍हा बारा उमेदवारांची यादी जाहीर करीत आरजीपीने दिलेल्‍या मतदारसंघांतही उमेदवार घोषित केल्‍याने काँग्रेस–आरजीपी युती तुटल्‍यात जमा होती.

या पार्श्वभूमीवर, काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि आरजीपी अध्‍यक्ष मनोज परब यांच्यासोबत चर्चा केली. मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनी वेळ घेतल्‍याने ते चर्चेला येणार की नाही, असा प्रश्‍‍न उपस्‍थित झाला होता.

पण, हे दोन्‍ही नेते ठाकरे यांच्‍या भेटीला गेल्‍याने आणि त्‍यांच्‍याशी युती आणि जागा वाटपाबाबत चर्चा केल्‍याने युतीसंदर्भातील आशा पुन्‍हा पल्लवित झाल्‍या आहेत.

तिघांमध्ये सकारात्‍मक चर्चा, ठाकरे

गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीच्‍या नेत्‍यांसोबत आमची काय चर्चा झाली आणि युती कशा पद्धतीने होणार, याची माहिती रविवारी देण्‍यात येईल. तिन्‍ही पक्षांमध्‍ये सकारात्‍मक चर्चा झालेली आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. तर, आरजीपीला युतीबाबत अगोदरच प्रस्‍ताव दिलेला होता. याबाबत रविवारीच घोषणा केली जाईल, असे प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर म्‍हणाले.

‘त्‍या’नंतरच उमेदवार जाहीर करू; विजय

गोवा फॉरवर्ड २०२२ च्‍या विधानसभा निवडणुकीपासूनच काँग्रेससोबत युतीत आहे. ठाकरेंसोबत शनिवारी झालेली बैठक सकारात्‍मक झाली, असे विजय सरदेसाई म्‍हणाले. जागा वाटपासंदर्भात आम्‍ही काँग्रेसवर कोणताही दबाव टाकलेला नाही. काँग्रेसकडून त्‍यावर शिक्‍कामोर्तब झाल्‍यानंतर गोवा फॉरवर्डचे उमेदवार जाहीर करण्‍यात येतील. परंतु, आम्‍ही आमचे काम सुरू केले आहे, असेे विजय म्हणाले.

बैठकीनंतर घेणार निर्णय : मनोज

प्रदेश काँग्रेसच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांच्‍या मागणीनुसार आम्‍ही प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्‍याशी चर्चा केलेली आहे. काँग्रेसने आम्‍हाला नवा प्रस्‍ताव दिलेला आहे, त्‍यावर शनिवारी रात्री पक्षाच्‍या नेत्‍यांशी चर्चा केली जाईल आणि त्‍यांनी त्‍यास मान्‍यता दिल्‍यानंतरच काँग्रेससोबत युती केली जाईल. त्‍याचा निर्णय रविवारी सकाळी जाहीर केली जाईल, असे आरजीपी अध्‍यक्ष मनोज परब यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharbandora Water Crisis: धारबांदोड्यात गढूळ पाणीपुरवठा, शिवडेवासीयांचे आरोग्य धोक्यात; रगाडा नदीपात्रातील कामाचा परिणाम

VIDEO: 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानं पाक जनरलला झोंबल्या मिरच्या; भाषेवरुन टीका करणाऱ्या जनरलची पाकिस्तानमध्येच नाचक्की

Goa Crime: मडगावातील दोन वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणाचा उलगडा; संशयितावर गुन्हा दाखल!

Goa Crime: किरकोळ भांडणातून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी ; खोर्ली-म्हापशात शाब्दिक वाद विकोपाला; एक गंभीर जखमी

CM Pramod Sawant: "गोवा परप्रांतीयांची 'दुबई' होऊ देऊ नका!" मुख्यमंत्री सावंतांचे युवकांना आवाहन; राज्य-केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीचा हात

SCROLL FOR NEXT