social activists  Dainik Gomantak
गोवा

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

Goa ZP Election: भाजपच्या राजवटीत गोव्याचे नाव जगात बदनाम होण्यासारख्या घटना घडत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: भाजपच्या राजवटीत गोव्याचे नाव जगात बदनाम होण्यासारख्या घटना घडत आहे. जमीन हडप करणे, गुंडगिरी, चोऱ्या, दरोडे, कचऱ्याच्या राशी, बेकायदेशीर कामांसाठी हफ्ते घेणे, यासारखे प्रकार वाढले आहेत. सरकारचे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राहिले नाही.

गोव्याचे अस्तित्व धोक्यात आहे, अशा परिस्थितीत आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रामाणिक, मूळ गोमंतकीय, गोव्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्यांना मत देण्याचे आवाहन मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्यांनी गोमंतकीयांना केले. या वेळी गोमंतकीयांनी समजूतदारपणे व शहाणपणाने मतदान करणे ही काळाची गरज आहे, असे सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेला फा. इरेमितो माँत रेबेलो, प्रतिमा कुतिन्हो, राजदीप नायक, एन्थनी डिसिल्वा व इफ्तियाज हे समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप इतर पक्षांतील आमदारांना आयात करून सरकार चालवत आहे, त्याच प्रमाणे घोटाळे वाढले आहेत,असे फा. इरेमितो रेबेलो यांनी सांगितले.

वेळ गेली नाही; जागे व्हा!

जिल्हा पंचायत निवडणूक ही २०२७ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वीची उपांत्य फेरी आहे, असे सांगून नाट्यकलाकार राजदीप नायक म्हणाले की जगभर गोव्याची बदनामी झाली आहे. असे सरकार यापूर्वी गोव्यात सत्तेत नव्हते. आवाज उठविणाऱ्यांना गुंडांकरवी मारहाण होत आहे. अजून वेळ गेली नाही. सर्व गोमंतकीयांनी जागे होणे आवश्यक आहे, असे नायक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT