Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत कुठे, किती टक्के झाले मतदान? वाचा आकडेवारी..

Goa Zilla Panchayt Election: लाटंबार्से मतदारसंघात सर्वाधिक ८८.२९ टक्के तर त्याच्यापाठोपाठ पाळी मतदारसंघात ८६.५८ टक्के मतदान झाले. मयेत ७९.६९ टक्के तर कारापूर-सर्वणमध्ये ७९.४० टक्के मतदान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: किरकोळ अपवाद वगळता डिचोली तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांत शांततेत आणि सुरळीतपणे मतदान झाले. नवमतदारांनीही उत्साहाने भाग घेताना मतदानाचा हक्क बजावला. चारही मतदारसंघांत मिळून सरासरी ८३.३६ टक्के मतदान झाले.

लाटंबार्से मतदारसंघात सर्वाधिक ८८.२९ टक्के तर त्याच्यापाठोपाठ पाळी मतदारसंघात ८६.५८ टक्के मतदान झाले. मयेत ७९.६९ टक्के तर कारापूर-सर्वणमध्ये ७९.४० टक्के मतदान झाले. डिचोली तालुक्यात झालेले एकंदरीत मतदान हे भाजपसाठी अनुकूल असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. तर काही भागात ‘सायलंट’ मतदान झाल्याने हे मतदान कोणाच्या बाजूने झालेय, ते पाहावे लागणार आहे.

डिचोली तालुक्यातील चारही मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी तथा अबकारी खात्याचे सहआयुक्त श्रीकांत पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. प्रत्येक मतदारसंघासाठी नियुक्त केलेले खास अधिकारी आपापल्या मतदारसंघातील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. खास नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी अधूनमधून मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत होते.

मतदान केंद्रांवर ‘व्हीलचेअर’ आदी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. डिचोली तालुक्यात येणाऱ्या लाटंबार्सेसह, मये, कारापूर-सर्वण आणि पाळी या चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांतील काही मतदान केंद्रांवर सकाळी संथगतीने मतदान सुरू होते. दहा वाजेपर्यंत वाजेपर्यंत जवळपास २० टक्क्यां आसपास मतदान झाले होते. अकरानंतर मात्र मतदानाला हळूहळू गती आली. दुपारपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते. सायंकाळी तर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.

सत्तरीत महिलांचीच सरशी

सत्तरी तालुक्यात केरी, नगरगाव, होंडा अशा तीन जिल्हा पंचायत मतदारसंघात शनिवार, ता. २० रोजी सकाळी ८ ते सायं. ५ वा.पर्यंत अगदी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण तिन्ही मतदारसंघांत महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून मतदान प्रक्रियेत सहभाग दर्शविला.

केरीत ८७.९९% मतदान झाले. एकूण १७,०७६ मतदारांपैकी १५,०२६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यात ७,३७८ पुरुष व ७,६४८ महिलांनी मतदान केले.

नगरगावात ८६.७१% मतदान झाले. एकूण १६,४५९ मतदारांपैकी १४,२७१ जणांनी मतदान केले. त्यात ७,०४३ पुरुष व ७,२२८ महिलांनी मतदान केले.

होंड्यात ८५.५१% मतदान झाले. एकूण १६,२३९ मतदारांपैकी १३,८८६ जणांनी मतदान केले. त्यात ६,८८४ पुरुष व ७,००२ महिलांनी मतदान केले.

सावकाश मतदान प्रक्रियेवर नाराजी

जिल्हा पंचायत निवडणुकीत कोलवा मतदारसंघातील सुरावली मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया एकदम सावकाश होती व मतदारांना एक-दोन तास रांगेत उभे राहावे लागले. कित्येक ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला. यावर कोलवाच्या अपक्ष उमेदवार नेली रॉड्रिग्स यांनी नाराजी व्यक्त केली. मतदान केंद्रावरील निर्वाचन अधिकारी व इतर कर्मचारी अगदीच सावकाश काम करीत असल्याने मतदारांची रांग वाढली, असे रॉड्रिग्स यांनी पत्रकारांना सांगितले.

रिवण येथे ७८.९८% मतदान

रिवण जिल्हा पंचायत निवडणुकीत समाधानकारक मतदान झाले आहे. एकूण पाच ग्रामपंचायतींतील २८ मतदान केंद्रांतून १६,६६६ पैकी १३,१६२ जणांनी मिळून ७८.९८ टक्के मतदान झाले. यात ७,०३१ महिला व ६,१३१ पुरुषांनी मतदान केले. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान झाले. एकूण तीन उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत असून यात भाजपतर्फे राजश्री गावकर, कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीतर्फे साहिज्ञा गावकर व ‘आप’तर्फे तेजस्विनी गावकर यांचा समावेश आहे.

साळ येथे काहीवेळ गोंधळ

१.निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराच्या वावरामुळे साळ येथे सकाळी काहीसा गोंधळ निर्माण झाला. संबंधित उमेदवार एका मतदान केंद्राजवळच घुटमळत होता. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी संबंधित उमेदवाराला तसेच मतदान केंद्रापासून काही अंतरावर जमावाने असलेल्या कार्यकर्त्यांना दूर केले.

२.साळ येथे वाद निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरबीआय पोलिसांची तुकडीही तैनात केली होती. येथे ८७.४५ टक्के मतदान केले. दरम्यान, मुळगाव येथील शिरोडवाडी येथील मतदान केंद्राजवळही गोंधळ झाल्याची माहिती मिळाली आहे.

बार्देशात उत्साह कमी

बार्देश तालुक्यातील मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत तालुक्यातून एकूण ९ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या ४३ उमेदवारांचे भवितव्य शनिवारी मतपेटीत बंद झाले. शनिवारी दिवसभरात, बार्देशात हळूहळू मतदानाची टक्केवारी वाढत गेली. विशेष म्हणजे, मतदानावेळी मतदारांमध्ये ‘झेडपी’साठी तितकासा उत्साह दिसत नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

Goa Opinion: गोव्याचा दुसरा मुक्तिलढा जमीन माफियांविरुद्धचा असेल..

2 दिवसांच्या कामासाठी दिले 500 रुपये मानधन! बालरथ चालकांचा ठिय्या; तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त Watch Video

Vijay Hazare Trophy: शुभमची संघात वापसी, कर्णधारपदाची धुरा दीपराजच्या खांद्यावर; एकदिवसीय स्पर्धेसाठी गोव्याचा संघ जाहीर

गोव्यासाठी विमान प्रवास महागला! नाताळच्या काळात तिकीट दरात मोठी वाढ; जयपूरहून येणाऱ्या पर्यटकांना बसतोय सर्वाधिक फटका

SCROLL FOR NEXT