पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होऊन ज्या २६६ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेट्यांमध्ये बंदिस्त झाले, त्यांच्या भवितव्याचा फैसला सोमवारी होणार आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्ष, मंत्री तसेच अनेक आमदारांनाही स्वत:च्या ताकदीचा अंदाज घेण्याची संधी असून, याबाबतचे चित्र सोमवारच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. शनिवारी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. सत्ताधारी भाजपसह, विरोधी काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, मगोप, आरजीपी या राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून स्वत:चे अस्तित्व तपासण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून केला.
जिल्हा पंचायतींच्या गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळच्या निवडणुकीत गोमंतकीय मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला. यावेळी ७०.८१ टक्के मतदान झाल्याने मतदारांनी कौल कोणत्या पक्षाला दिला आहे, हे पाहण्यासाठी सर्वांच्याच नजरा सोमवारच्या निकालाकडे लागल्या आहेत.
भाजप (४०)
हरमल, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणा, शिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, सांताक्रूझ, ताळगाव, खोर्ली, चिंबल, सेंट लॉरेन्स, लाटंबार्से, कारापूर-सर्वण, मये, पाळी, होंडा, केरी, नगरगाव, उसगाव-गांजे, बेतकी-खांडोळा, कुर्टी, बोरी, शिरोडा, दवर्ली, गिरदोली, नावेली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, बार्शे, खोला, पैंगीण, सांकवाळ.
काँग्रेस (३६)
हरमल, मोरजी, शिवोली, हळदोणा, शिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, सांताक्रूझ, ताळगाव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स, पाळी, होंडा, केरी, नगरगाव, उसगाव-गांजे, कुर्टी, बोरी, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली, सावर्डे, शेल्डे, बार्शे, खोला, सांकवाळ, कुठ्ठाळी.
गोवा फॉरवर्ड (९)
मोरजी, धारगळ, खोर्ली, कारापूर-सर्वण, मये, शिरोडा, राय, रिवण, पैंगीण
मगोप (३)
मोरजी, कवळे, वेलिंग-प्रियोळ.
आप (४२)
धारगळ, तोरसे, कोलवाळ, हळदोणा, शिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, सांताक्रूझ, ताळगाव, खोर्ली, चिंबल, सेंट लॉरेन्स, लाटंबार्से, कारापूर-सर्वण, मये, केरी, नगरगाव, उसगाव-गांजे, कुर्टी, वेलिंग-प्रियोळ, बोरी, राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, गिरदोली, कुडतरी, नावेली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, बार्शे, खोला, पैंगीण, सांकवाळ. आरजीपी (३०) हरमल, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणा, शिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, सांताक्रूझ, चिंबल, सेंट लॉरेन्स, होंडा, नगरगाव, उसगाव-गांजे, बेतकी-खांडोळा, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बोरी, शिरोडा, राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, सावर्डे, धारबांदोडा, कुठ्ठाळी.
विधानसभा निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपल्याने अनेक मंत्री, आमदारांसाठीही जिल्हा पंचायत निवडणूक महत्त्वपूर्ण होती. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी टिकवायची असेल तर जिल्हा पंचायत मतदारसंघांमधील आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यामुळे आपापल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात त्यांनी गेले काही दिवस स्वत:ला झोकून दिले होते. अशा सर्व मंत्री, आमदारांच्या भवितव्याचा फैसलाही सोमवारच्या निकालानंतरच होणार असल्याने त्यांचेही लक्ष निकालाकडे लागून आहे.
राज्यातील १५ मतदान केंद्रांवर मतमोजणी होणार असून, राज्य निवडणूक आयोगाने त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली आहे. सोमवारी सकाळी ८ पासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याने दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.