Goa ZP Election: मतदानाला सुट्टी मिळाली नाही! नागरिक संतप्त; कारवाई करण्याची होतेय मागणी

Goa Zilla Panchayat Election: पेडणे तालुक्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी हरमल, मोरजी व धारगळ या चारही मतदारसंघातून संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान झाले.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडणे तालुक्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी हरमल, मोरजी व धारगळ या चारही मतदारसंघातून संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान झाले. मतदान सुरळीतपणे पार पडले.

मतदानावेळी कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयाकडून प्रथमच मतदानाची जबाबदारी गटविकास कार्यालयाकडे देण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्यांना निवडणूक व मतदानाचा फारसा अनुभव नसल्याने काही गोष्टींना उशीर होत होता.

मतदानासाठी जाहीर सुट्टी असली तरी औद्योगिक वसाहती व बँकांतील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात न आल्याने अशा विभागांचे कर्मचारी मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत, तर काही आस्थापनांनी मतदानासाठी दोन तास अगोदर जाण्याची मुभा दिली होती. पण दूरवर असलेले कर्मचारी या वेळेतही मतदानासाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.

Goa
Goa ZP Election: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत कुठे, किती टक्के झाले मतदान? वाचा आकडेवारी..

त्यामुळे असे बरेचजण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले, तर काहींनी सुट्टी घेऊन किंवा गैरहजर राहून मतदान करणे पसंत केले. यामुळे अशा मतदारांत संताप व्यक्त करण्यात येत होता. निवडणुकीसाठी सरकारने सुट्टी जाहीर करूनही सुट्टी न दिल्याने अशा आस्थापनांविरुद्ध मतदारांत संताप व्यक्त करण्यात येत होता. अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात यावी, असे काहीजणांनी सांगितले.

Goa
Goa ZP Election: गोव्यात विक्रमी 70.81% मतदान! 266 उमेदवारांचे भवितव्‍य मतपेट्यांत बंदिस्‍त; वाढीव मतदारांचा कोणत्‍या पक्षाला कौल?

चर्चा रंगल्या

मतदान झाल्यानंतर उमेदवारांचे समर्थक तसेच इतरत्र गटागटांतून निवडणुकीसंदर्भात आढावा घेत आपल्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कुठे जास्त मतांची आघाडी मिळणार, ऐनवेळी कुणी दगाफटका केला, पैशांचा वापर झाला का, यावर चर्चा होत होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com