Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: युतीची घोषणा रखडली! 'जिल्हा पंचायत'साठी जागा वाटपाचा तिढा; फॉरवर्ड-आरजीची नजर काँग्रेसच्या निर्णयाकडे

Goa Zilla Panchayat Election: प्राप्त माहितीनुसार दोन्ही पक्षांकडून जागा वाटपाचा विषय मांडला होता, पण काँग्रेसकडून अजूनही त्या विषयावर एकमत होणे बाकी असल्याने आघाडीची घोषणा होण्यास विलंब होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी अशा आघाडीची घोषणा काँग्रेसच्या प्रलंबित निर्णयामुळे रखडली आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही पक्षांकडून जागा वाटपाचा विषय मांडला होता, पण काँग्रेसकडून अजूनही त्या विषयावर एकमत होणे बाकी असल्याने आघाडीची घोषणा होण्यास विलंब होत आहे.

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर विरोधकांनी एकत्र यावे लागेल, असे वारंवार विरोधकांकडून सांगण्यात आले. परंतु विरोधातील एका बाजूला गोवा फॉरवर्डच्या काही उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. काँग्रेस अद्याप बोगस मतदारांवर जागृती मोहीम राबवित आहे आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचित करीत आहे.

युतीच्या घोषणेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून थोडा धीर धरा, असे सांगितले जात आहे. युतीतील घटक पक्ष असणाऱ्या गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, काँग्रेस युतीतील मूळ घटक पक्ष आहे आणि त्यांनी ती घोषणा करणे गरजेचे आहे.

आम्हीही त्यांच्याकडून घोषणेची वाट पाहत आहोत. त्याचप्रमाणे आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनीही जागा वाटपाचा कोणताही वाद राहिला नाही. आम्ही आमच्यावतीने जागा सांगितलेल्या आहेत, आघाडीची घोषणा काँग्रेसकडून होण्याची आम्हीही वाट पाहत आहोत, असे सांगितले.

कॉंग्रेसची उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

घटक पक्षातील नेत्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून काँग्रेसकडून युतीची घोषणा होण्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दोन्ही घटक पक्षाला जिल्हा पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी आघाडी जाहीर व्हावी, असे वाटत असले तरी होणारा विलंबही योग्य नसल्याचे या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. काँग्रेसने आघाडी करण्याविषयी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा निर्णय सर्वस्वी अंतिम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयाकडे दोन्ही घटक पक्षांचे नेते डोळे लावून बसले असल्याचेच चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंध फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

Goa Salt Pans: 1964 साली गोव्यात 200 हून अधिक मिठागरे होती आणि आज..?

Goa Live News: साष्टी तालुक्यात वाहतूक पोलिसांचा 'बडगा'

SCROLL FOR NEXT