Goa Zilla Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड व आरजी एकत्र येणार का? प्रमुख नेत्यांची होणार बैठक; काँग्रेससमोर युती राखण्याचे आव्हान

Goa Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी एकत्रित आघाडी करून लढणार असल्याचे सुतोवाच आत्तापर्यंत करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी एकत्रित आघाडी करून लढणार असल्याचे सुतोवाच आत्तापर्यंत करण्यात आले. परंतु आता त्यावर , रविवारी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे आणि त्यात जागा वाटपाचा महत्त्वाचा प्रश्न सोडवला जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या उच्चस्तरीय समिती सदस्यांनी ‘गोमन्तक'ला दिली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या वाढदिनादिवशी झेडपी निवडणुकांत भाजपविरोधात काँग्रेस-गोवा फॉरवर्ड व आरजी एकत्रित लढणार असल्याचे जाहीर झाले. त्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनीही या युतीचे संकेत दिले आहेत. त्याशिवाय गोवा फॉरवर्ड पक्षाने जिथे आपले प्राबल्य आहे, तिथल्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे.

शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे आरजी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा होता, तो या बैठकीत सोडविला जाईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व आरजी नेत्यांनीही जागा वाटपाचा चेंडू काँग्रेसच्या गोटात टाकला आहे. त्यामुळे काँग्रेसला तडजोड करून युती राखण्याचे आव्हान असणार आहे.

काँग्रेसच्या सांतआंद्रे, सांताक्रूझ, थिवीतील काँग्रेस कार्यकर्ते आणि दक्षिण गोवा खासदारांनी आरजीपीला बरोबर घेऊ नका असा सूर लावला असला तरी पक्षातील एक गट युतीच्या बाजूने आहे. भाजपला पराभूत करावयाचे असल्यास आणि तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्यास ते शक्य आहे, असे काँग्रेसच्या उच्चस्तरीय समितीच्या नेत्यांना वाटते. युतीचा सर्वस्वी निर्णय उच्चस्तरीय समितीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रदेशाध्य अमित पाटकर यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कॉंग्रेसला तडजोड करावी लागण्याची शक्यता

तिन्ही पक्षांच्या युतीची घोषणा न झाल्याने ‘आप’नेही त्यावर टीकेची संधी सोडली नाही. ‘आप’ला बाजूला ठेवून काँग्रेसने इतर दोन पक्षांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. तर दुसरीकडे ‘आप’चे व्हिएगस यांनी गुगली टाकत ‘आप’ आणि आरजी भविष्यात एकत्र येण्याचे भाकित केले आहे. यावरून ‘आप' व ‘काँग्रेस' आरजीला आपल्याकडे खेचण्यात चढाओढ करण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत काँग्रेसला काही जागांवर तडजोड करावी लागणार असल्याचेही समिती सदस्यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT