Job Fraud Case Goa Dainik Gomantak
गोवा

US Job Fraud: बनावट दस्तावेज देऊन अमेरिकेत नोकरीला पाठवले! लाखोंची अफरातफर; 3 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

US job fraud in Goa: अजय शिरोडकर, संकेत रामनाथकर व आवेश काकोडकर अशी संशयितांची नावे आहेत. त्‍यांनी अटकपूर्व जामिनासाठी ९ मे रोजी अर्ज केला होता.

Sameer Panditrao

पणजी: अनेक युवकांना अमेरिकेत मोठ्या वेतनाच्या नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी रायबंदर गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अजय शिरोडकर, संकेत रामनाथकर व आवेश काकोडकर अशी संशयितांची नावे आहेत. त्‍यांनी अटकपूर्व जामिनासाठी ९ मे रोजी अर्ज केला होता. त्‍यावरील सुनावणी उद्या १४ मे रोजी मेरशी अतिरिक्त सत्र न्यायालयात होणार आहे.

क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीची ही तक्रार नुवे येथील नितेश नाईक यांनी २ मे २०२५ रोजी दाखल केली होती. वरील तिघांनी कटकारस्थान रचून तक्रारदाराला अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्‍यांच्‍याकडून २८ लाख रुपये बँक व रोख रकमेच्या स्वरूपात घेतले.

तसेच आपण अधिकृत नोंदणी असलेले रिक्रुटमेंट दलाल असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्याकडे रजिस्टरिंग ऑथॉरिटीचा कोणताही परवाना नाही. त्यांनी तक्रारदार व इतरांना नोकरीसाठी परदेशात जाण्याचे बनावट दस्तावेज दिले व परदेशात पाठवले. तेथे गेल्यावर नोकरी नसल्याचे त्‍यांच्‍या लक्षात आले.

पैसे मागितल्‍यावर दिली धमकी

प्रवासासाठी देण्यात आलेले दस्तावेज बनावट असल्याने फणवणूक झालेल्‍यांवर अनेक देशांमध्‍ये प्रवास करण्याची वेळ आली. यासंदर्भात संशयितांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय गोव्यात परतल्यावर घेतलेली रक्कमही परत करण्यास नकार दिला. रक्कम परत करण्याची विनंती केल्यावर त्यांनी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्‍यान, या संशयितांविरोधात पणजीतही काही तरुणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT