
पणजी: बलात्कारप्रकरणी जामिनावर असलेल्या श्रीलंकन संशयिताच्या मोबाईलमध्ये पीडितेची अश्लील छायाचित्रे असल्याने ती तो व्हायरल करण्याची तसेच त्याला पासपोर्ट दिल्यास तो फरारी होण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवत जलदगती विशेष न्यायालयाने (पोक्सो) त्याला पासपोर्ट व मोबाईल नाकारला.
तरुणीवरील बलात्कारप्रकरणी संशयित महम्मद नसुरुद्दीन महम्मद इस्मथ याला अटक झाली होती. त्यावेळी त्याच्याकडील मोबाईल व पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. त्याला ७ जून २०२४ रोजी जामीन मिळाला होता.
त्याचा व्हिसा २५ जुलै २०२३ रोजी संपला होता. खटल्यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला गोव्यातच वास्तव्य करावे लागणार असल्याने व्हिसा वाढवून घेण्यासाठी त्याची गरज आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये संशयिताच्या बँक खात्याची माहिती आहे व त्यामुळे पैशांचा व्यवहार मोबाईलनेच करत असल्याने त्याला खर्च भागवणे कठीण होत आहे. न्यायालयाला पासपोर्ट व मोबाईल जेव्हा गरज भासेल तेव्हा उपलब्ध केला जाईल. त्यामुळे पासपोर्ट व मोबाईल न्यायालयाने द्यावा, अशी विनंती संशयिताने केली होती.
कारवाईवेळी संशयिताकडून पासपोर्ट व मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्याचा मोबाईल फोरेन्सिक लॅबकडे अजून पाठविलेला नाही. त्याने पीडितेची नग्न छायाचित्रे काढलेली आहेत. जर त्याला मोबाईल दिल्यास तो ही छायाचित्रे व्हायरल करू शकतो.
आरोपपत्रातील आरोप निश्चित करण्याच्या स्थितीत खटला आहे व साक्षीदारांची साक्ष अजूनही नोंदवणे बाकी आहे त्यामुळे मोबाईल व पासपोर्ट याक्षणी संशयिताला परत करणे योग्य होणार नाही. खटल्यावरील सुनावणीवेळी त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी बाजू मांडत सरकारी वकिलांनी त्याच्या अर्जाला हरकत घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.