Goa would have become independent in 1955 CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

...तर गोवा 1955 मध्येच स्वतंत्र झाला असता, CM प्रमोद सावंत यांनी काँग्रेस आणि नेहरूंवर फोडले खापर

गोव्यात 1955 साली झालेल्या आंदोलनाच्या वेळीच ऑपरेशन विजय करायला हवे होते - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Pramod Yadav

भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाचाच एक भाग असलेल्या गोवा राज्याला स्वतंत्र व्हायला तब्बल 14 वर्षे लागली. 1955 मध्ये झालेल्या आंदोलनातच गोवा स्वतंत्र झाला असता. पण त्यावेळी देशात असलेल्या सरकारने योग्य पावले उचलली नाहीत, त्याचवेळी ऑपरेशन विजय झाले असते तर गोवा तेव्हाच स्वतंत्र झाला असता असे परखड मत राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी मांडले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एका स्थानिक टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रमोद सावंत यांनी देशातील तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली.

गोव्यातील पोर्तुगिजांच्या खाणाखुना पुसण्याचा उल्लेख मागील काही दिवसांपूर्वी केला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, "पोर्तुगीज मानसिकता खोडून काढण्याच्या माझ्या मतावर मी ठाम आहे. आपण केवळ राज्यातील 450 वर्षे पोर्तुगीज राजवटीबद्दल बोलतो. त्यापूर्वी राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप गोष्टी केल्या आहेत."

"तसेच, कदंब राजा, मौर्य आणि भोज देखील या भूमीत होते. हा देखील एक इतिहास आहे. पण, आपल्याला केवळ पोर्तुगिजांबद्दल सांगितले जाते. गोव्याला स्वतंत्र होऊन 60 वर्षे झाली आणि आपल्याला पोर्तुगीज मानसिकतेतून बाहेर पडायला हवे." असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांडले.

"आपल्याला तोच तोच इतिहास सांगितला आणि शिकवला गेला. आम्हाला 14 वर्षे उशीरा स्वातंत्र्य का मिळाले? गेल्या साठ वर्षात आम्हाला कधी हा प्रश्नच पडला नाही. भारताला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आम्हाला 1961 मध्ये का मिळाले? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. या 14 वर्षात गोवा किती मागे पडला."

"मी त्यावेळच्या राज्यकर्त्यांना दोष देतो. 1955 साली झालेले आंदोलन कोण विसरू शकते. देशाभरातून आलेल्या वीरांवर पोर्तुगिजांनी केलेला गोळीबार कोण विसरू शकते. गोवा मुक्त करण्यासाठी त्यावेळी मध्यप्रदेश, आसाम, बिहार यासारख्या राज्यातून स्वातंत्र्य सैनिक 1955 मध्ये गोव्यात आले होते. 1955 पासून तयार करण्यात आलेल्या दबावामुळे 1961 मध्ये ऑपरेशन विजय करावे लागले." असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

"गोव्यात 1955 साली झालेल्या आंदोलनाच्या वेळीच ऑपरेशन विजय करायला हवे होते. स्वातंत्र्यसैनिकांवर गोळीबार झाला त्याचवेळी कारवाई केली असता गोवा मुक्त झाला असता, शिवाय गोळीबार झाला त्यावर सरकारकडून काहीतरी प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते." असेही सावंत म्हणाले.

"1955 मध्ये ऑपरेशन विजय झाले असते तर गोवा पाच वर्षे अगोदर स्वतंत्र झाला असता ते वेगळे पण त्या गोळीबाराचा बदला घेणे देखील तेवढेच महत्वाचे होते." असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी नमूद केले.

या सगळ्या घटनेला त्यावेळेचे काँग्रेस सरकार आणि पंतप्रधान नेहरू जबाबदार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT