Goa Electrocution Death Dainik Gomantak
गोवा

Goa Electrocution Death: बाळ्ळीत मोठी दुर्घटना! नारळ फार्मवर काम करताना 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?

Goa Farm Accident: बाळ्ळी येथील एका नारळ फार्मवर बुधवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: वीज वाहिनीला लोखंडी शिडीचा स्पर्श होऊन २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिलोय, बाळ्ळी येथील एका नारळ फार्मवर बुधवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. दिलीप सिंग असे मृताचे नाव असून, तो मूळचा झारखंड राज्यातील गुमला जिल्ह्यातील रहिवासी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजॉय कोकोनट फार्ममध्ये ही घटना घडली. मृत तेथे कामगार म्हणून कार्यरत होता. परागीकरणाच्या कामासाठी तो लोखंडी शिडी घेऊन जात असताना शिडीचा वीज वाहिनीला स्पर्श झाला.

त्यामुळे त्याला विजेचा झटका बसून तो खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्यानंतर फार्मवरील अन्य सहकाऱ्यांनी त्याला १०८ रुग्णवाहिकेतून बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

कुंकळ्ळी पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहेत. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT