Sepak Takraw  
गोवा

National Games Goa 2023: सेपॅक टॅक्रो खेळात गोव्याचा सुवर्ण ‘षटकार’

पुरुष गटात चार, तर महिला गटात दोन विजेतेपद

किशोर पेटकर

Sepak Takraw: आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या समावेशाने बलवान बनलेल्या गोव्याने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सेपॅक टॅक्रो खेळात शुक्रवारी सुवर्णपदकांचा षटकार लगावला. पुरुष गटात चार, तर महिला गटात दोन विजेतेपद पटकावल्यामुळे यजमानांचे या खेळात दमदार वर्चस्व सिद्ध झाले.

सहा सुवर्णांव्यतिरिक्त प्रत्येकी एक रौप्य व ब्राँझ अशी एकूण आठ पदके या खेळात मिळाली.

फातोर्डा येथील इनडोअर स्टेडियममध्ये शुक्रवारी एकूण आठ सुवर्णपदकांसाठी चुरस होती, त्यापैकी सहा गोव्याच्या खाती जमा झाली. २०१८ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक जिंकलेल्या नऊ आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या समावेशाने गोव्याची स्पर्धेत ताकद वाढली.

शुक्रवारी गोव्याला पहिले सुवर्णपदक पुरुषांच्या दुहेरीत मिळाले. त्यांनी केरळला २-० फरकाने हरविले. पुरुष संघाने क्वाड्रांट प्रकारात दिल्लीच कडवे आव्हान २-१ फरकाने परतावून लावत दुसऱ्या सुवर्णपदकासह गवसणी घातली. नंतर पुरुष सांघिक प्रकारातही मणिपूरला २-१ फरकानेच हरवून तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

या वेळी आक्रमक फळीतील राजू युमनाम याची खेळी अफलातून ठरली. पुरुष गटातील चौथे सुवर्णपदक गोव्याने रेगू प्रकारात जिंकताना मणिपूरला पराभूत केले.

महिलांचाही प्रभावी खेळ

सॅपेक टॅक्रोत गोव्याच्या महिला संघानेही दमदार खेळ केला. महिला दुहेरी अंतिम लढतीत आंध्र प्रदेशचा २-१ फरकाने पाडाव केल्यानंतर, क्वाड्रांट प्रकारात हरियानाचा २-० असा धुव्वा उडविला. महिला गटात गोव्याला आणखी दोन पदके मिळाली. यामध्ये रौप्य व ब्राँझपदकाचा समावेश आहे. सांघिक गटात यजमान संघाला मणिपूर कडून ०-२ फरकाने पराभूत व्हावे लागल्याने गोव्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

याशिवाय गोव्याला महिलांच्या रेगू प्रकारात ब्राँझपदकही मिळाले. १५ वर्षीय खेळाडू प्रीती लांगोलजाम हिने दोन्ही सुवर्णपदकांत उल्लेखनीय खेळ केला. ‘‘मोठ्या स्पर्धेत पदके जिंकण्याचे माझे स्वप्न होते, त्याची पूर्तता आज झाली,’’ असे प्रीती हिने नंतर सांगितले.

सेपॅक टॅक्रो म्हणजे काय?

सेपॅक टॅक्रो याला किक व्हॉलिबॉल या नावानेही ओळखले जाते. कोर्टच्या मधोमध बॅडमिंटनप्रमाणे नेट आणि दोन्ही बाजूंचे खेळाडू व्हॉलिबॉलप्रमाणे पायाने खेळतात.

"माझी ही पहिलीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. आम्ही एकूण चार सुवर्णपदके जिंकल्यामुळे मी खूप आनंदित आहे. चारही गटात आम्ही निर्विवाद वर्चस्व राखल्याने खूपच उत्साहित आहे. हे यश संघ सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले. आम्ही एकत्रित भरपूर सराव केला. आता आम्ही कोर्टवर आणि बाहेरही जवळचे मित्र बनलो आहोत," असे खेळाडू राजू युमनाम म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT