Goa women's cricket team defeated Uttar Pradesh  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या महिलांचा विजयी ‘चौकार’

टी-20 क्रिकेट; उत्तर प्रदेशला नमवून गटात अव्वल, बाद फेरी जवळपास निश्चित

दैनिक गोमन्तक

पणजी : सलामीस बढती मिळालेल्या संजुला नाईकचे नाबाद अर्धशतक, तसेच तिने तेजस्विनी दुर्गड व कर्णधार शिखा पांडे यांच्यासह केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारी या बळावर गोव्याने शुक्रवारी सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली आणि एलिट ड गटात अव्वल स्थानही राखले. त्यांचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जातो.

मोहाली येथील महाराजा यदविंद्र सिंग क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या लढतीत गोव्याने उत्तर प्रदेशला आठ विकेट्स आणि सहा चेंडू राखून सहजपणे हरविले. विजयासाठी 124 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर गोव्याने 19 षटकांत फक्त दोन विकेट गमावून लक्ष्य गाठले. संजुलाने नाबाद 50 धावा केल्या. तिने 55 चेंडूंतील खेळीत चार चौकार मारले. संजुलाने तेजस्विनी (33) हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. तेजस्विनीने 34 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार व एक षटकार मारला. नंतर आक्रमक फलंदाजी केलेल्या शिखाच्या साथीत संजुलाने तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची अभेद्य भागीदारी केली. शिखाने पाच चौकारांच्या मदतीने 19 चेंडूंत 29 धावांची खेळी केली.

त्यापूर्वी उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण गोव्याच्या नियंत्रित गोलंदाजीसमोर त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 6 बाद 123 धावांचीच त्यांना मजल मारता आली. चौथ्या विकेटसाठी अंजली सिंग व मुस्कान मलिक यांनी केलेल्या 43 धावांच्या भागीदारीमुळे उत्तर प्रदेशला थोडेफार सावरता आले. डावाच्या अखेरीस निशू चौधरी हिने फटकेबाजी केल्यामुळे उत्तर प्रदेशला सव्वाशेच्या जवळपास धावा केल्याचे समाधान लाभले.

शेवटची लढत बडोद्याशी

एलिट ड गटात 16 गुणांसह गोव्याचा संघ प्रथम आहे. त्यांचा शेवटचा सामना रविवारी (ता. 24) बडोद्याविरुद्ध होईल. शुक्रवारी बडोद्याने गुजरातला 20 धावांनी हरवून तिसरा विजय नोंदविला. त्यांचे 12 गुण झाले असून दुसरा क्रमांक आहे. गोव्याने बडोद्यालाही हरविल्यास शिखा पांडेच्या नेतृत्वाखालील संघ गटसाखळीत अव्वल राहत थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल. गटातील अन्य संघांत उत्तर प्रदेशचे आठ, तर गुजरात, विदर्भ व उत्तराखंडचे प्रत्येकी चार गुण आहे. अखेरच्या तिन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानला मोठा झटका! खैबर पख्तूनख्वामध्ये 'टीटीपी'चा सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला, 10 जवान ठार VIDEO

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT