Goa women crime report Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चिंताजनक! गोव्‍यासह देशभरात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ; NCRBच्या अहवालातून माहिती उघड

Goa women crime report: गोव्‍यासह देशभरात २०२१ ते २०२३ या कालावधीत घडलेल्‍या महिला अत्‍याचाराच्‍या घटनांचा आढावा आकडेवारीसह ‘एनसीआरबी’च्‍या २०२३ मधील अहवालातून प्रसिद्ध करण्‍यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍यात २०२१ ते २०२३ या काळात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ झाल्‍याचे राष्‍ट्रीय गुन्‍हेगारी अहवालातून (एनसीआरबी) समोर आले आहे. राज्‍यात २०२१ मध्‍ये महिला अत्‍याचाराच्‍या २२४ घटना घडल्‍या होत्‍या. २०२२ मध्‍ये ही संख्‍या २७३ झाली. तर, २०२३ मध्‍ये त्‍यात वाढ होऊन हा आकडा २८६ इतका झाल्‍याचेही हा अहवाल दर्शवतो.

गोव्‍यासह देशभरात २०२१ ते २०२३ या कालावधीत घडलेल्‍या महिला अत्‍याचाराच्‍या घटनांचा आढावा आकडेवारीसह ‘एनसीआरबी’च्‍या २०२३ मधील अहवालातून प्रसिद्ध करण्‍यात आला आहे.

गोव्‍यात ७.८ लाख महिलांपैकी ७८३ महिला या तीन वर्षांच्‍या काळात अत्‍याचारांना बळी पडल्‍या. एकूण महिलांच्‍या तुलनेत ३६.५ टक्‍के महिलांवर अत्‍याचार झाला असून, यातील ७४.२ टक्‍के प्रकरणांत आरोपपत्रे दाखल करण्‍यात आली असल्‍याचेही अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.

दरम्‍यान, गोव्‍याप्रमाणेच इतर राज्‍यांमध्‍येही २०२१ च्‍या तुलनेत २०२३ मध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत वाढ झाली. २०२१ मध्ये अशाप्रकारच्‍या ४,२८,२७८ प्रकरणांची नोंद झाली होती. २०२२ मध्ये हा आकडा ४,४५,२५६ इतका झाला. २०२३ मध्ये त्‍यात पुन्‍हा वाढ होऊन ही संख्‍या ४,४८,२११ इतकी झाल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.

या काळात महिला अत्‍याचारांसंदर्भातील सर्वाधिक गुन्‍ह्यांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये (६६,३८१) झाली. त्यानंतर या यादीत महाराष्ट्र (४७,१०१), राजस्थान (४५,४५०), पश्चिम बंगाल (३४,६९१), मध्य प्रदेश (३२,३४२) या राज्‍यांचा क्रमांक लागत असल्‍याचेही अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

ज्‍येष्‍ठ नागरिकांविरुद्धच्‍या अत्‍याचारात घट

राज्‍यात २०२१ च्‍या तुलनेत २०२३ मध्‍ये ज्‍येष्‍ठ नागरिकांविरुद्धच्‍या अत्‍याचारांमध्‍ये घट झाली. २०२१ मध्‍ये ज्‍येष्‍ठ नागरिकांवर अत्‍याचार झाल्‍याच्‍या ५० घटनांची नोंद झाली होती. २०२२ मध्‍ये हा आकडा ३५ इतका झाला. परंतु, २०२३ मध्‍ये ही संख्‍या ४० इतकी झाली. एकूण ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या तुलनेत ही सरासरी २४.५ टक्‍के इतकी होती. तर, यातील ६१.५ टक्‍के प्रकरणांत आरोपपत्रे दाखल करण्‍यात आल्‍याचेही अहवालातून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

SCROLL FOR NEXT