Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Haryana Honour Killing: राधिका ( वय 33) या मूळच्या पंजाबमधील (Punjab) मानसा जिल्ह्यातील झंडाकलां गावच्या रहिवासी होत्या.
Honour Killing
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Haryana Honour Killing: हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीच्या तोकड्या कपड्यांना आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका 18 वर्षीय अल्पवयीन भावाने आपल्या 33 वर्षीय बहिणीला कपडे धुण्याच्या लाकडी बॅटने मारहाण करुन तिची निर्घृणपणे हत्या केली. सोमवारी (6 ऑक्टोबर) फतेहाबादच्या मॉडेल टाऊन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राधिका (वय 33) या मूळच्या पंजाबमधील (Punjab) मानसा जिल्ह्यातील झंडाकलां गावच्या रहिवासी होत्या. 2016 मध्ये त्यांनी सिरसा येथील राय सिंग यांच्याशी प्रेमविवाह केला होता. हे जोडपे फतेहाबाद येथील मॉडेल टाऊनमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.

राधािका यांचा 18 वर्षीय भाऊ हसनप्रीत याचे तिच्या कपडे आणि चारित्र्यावरुन सतत आक्षेप होते. सोमवारी हसनप्रीत बहिणीच्या घरी आला होता. याचवेळी दोघांमध्ये या विषयावरुन जोरदार वाद सुरु झाला. वाद विकोपाला जाताच हसनप्रीतने रागाच्या भरात तिथे असलेल्या लाकडी बॅटने बहिणीच्या डोक्यावर आणि शरीरावर वारंवार वार केले, ज्यामुळे राधिका गंभीर जखमी झाली.

Honour Killing
Haryana Crime: हरियाणात 'सेक्स्टॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश; 728 लोकांना जाळ्यात अडकावणारे 8 गजाआड!

उपचारादरम्यान मृत्यू

राधिकाचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावले, तेव्हा आरोपी हसनप्रीत घटनास्थळावरुन पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या राधिकाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अग्रोहा येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला.

Honour Killing
Haryana Assembly Election: सत्तेचं स्वप्न भंगल पण, मुस्लिमबहुल जागांवरील काँग्रेसच्या विजयात रोहिंग्यांनी बजावली भूमिका?

पोलीस तपास सुरु

फतेहाबाद शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेंद्र यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. "हे प्रकरण अतिशय गंभीर असून तपास सुरु आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबाच्या आधारावर आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे महिलांना स्वातंत्र्य आणि समानतेचे बोलले जात असताना दुसऱ्या बाजूला भावानेच आपल्या बहिणीच्या वैयक्तिक निवडीवर आक्षेप घेऊन तिची हत्या केल्याच्या या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. 'ऑन-र ऑनर किलिंग' (Honour Killing) च्या दिशेने जाणाऱ्या या घटनेची कसून चौकशी करुन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com