Goa land Sale Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa land Sale Fraud: जमीन विक्रीच्या नावाखाली महिलेची 8 लाखांची फसवणूक; 30 लाख 40 हजारांचा व्यवहार, पोलिसांत गुन्हा दाखल

Goa Woman Cheated Of Rs 8 lakh: सां जुझे दि अरियाल येथे भूखंड विक्रीच्या नावाखाली एका महिलेची ८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: सां जुझे दि अरियाल येथे भूखंड विक्रीच्या नावाखाली एका महिलेची ८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पूजा हेदे यांनी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी देवेंद्र केंकरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने सां जुझे दि अरियाल येथील सर्व्हे क्र. १९०/१ मधील ३०४ चौ. मी. क्षेत्रफळाचा प्लॉट खरेदी करण्यासाठी संशयितासोबत करार केला होता. या जमिनीचा व्यवहार ३० लाख ४० हजार रुपयांना ठरला होता. या व्यवहारासाठी हेदे यांनी संशयिताला आगाऊ रक्कम म्हणून दोन टप्प्यांत ८ लाख रुपये दिले.

२० जानेवारी २०२५ रोजी धनादेशाद्वारे ५ लाख रुपये, तर १३ मार्च २०२५ रोजी ‘आरटीजीएस’द्वारे ३ लाख रुपये संशयिताच्या खात्यात जमा करण्यात आले. आगाऊ रक्कम स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांत खरेदीखत करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, मुदत संपल्यानंतरही संशयिताने खरेदीखत करून दिले नाही. तसेच वारंवार पाठपुरावा करूनही घेतलेली रक्कम परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पूजा हेदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. उपनिरीक्षक आशुतोष नाईक पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT