Goa Winter Update Dainik Gomantak
गोवा

Goa Winter Update: राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी, पारा घसरला 17.5 अंशांवर

Goa Winter: राज्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्याचा प्रभाव अधिकच वाढल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून हुडहुडी भरविणारी थंडी पडत असून दिवसेंदिवस किमान तापमानात घट होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्याचा प्रभाव अधिकच वाढल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून हुडहुडी भरविणारी थंडी पडत असून दिवसेंदिवस किमान तापमानात घट होत आहे. काल राज्यात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

उपलब्ध आकडेवारीनुसार, आतापर्यंत १२ डिसेंबर १९८१ साली सर्वांत कमी म्हणजेच १५.७ अंश सेल्सिअसवर किमान पारा गेला होता. अनेकदा डिसेंबरमध्ये तापमानात १६, १७ अंशांवर गेले आहे.

परंतु १८ अंशांखाली राज्यातील तापमान जाण्याची घटना वारंवार घडत नाही. त्यामुळे उपलब्ध आकडेवारीनुसार यापूर्वी २०११ साली किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअसवर गेले होते.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. किमान तापमान काही अजून मोठ्या प्रमाणात घटणार नाही; परंतु अशाच प्रकारची कमी-अधिक प्रमाणात थंडी पुढील काही दिवस राहणार आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

- नहुष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snehal Kavathankar: गोवा क्रिकेटसाठी मोठी बातमी! कर्णधार 'स्नेहल'ला प्रतिष्ठेचा सन्मान; BCCI च्या पुरस्काराचा होणार मानकरी

Rahul Dravid: 'राहुल द्रविड'चा BCCI करणार गौरव? लवकरच होणार घोषणा; शुभमन, मिताली राजचीही नावे पुढे

अग्रलेख: राज्यात किडनी विकाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे वास्तव; संशोधन, तपासणी मोहिमेची गरज

Goa Temperature: गोमंतकीयांनो काळजी घ्या! उन्हाचा तडाखा वाढला; येत्या दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता

Deposit Refund Scheme: स्वच्छ गोव्यासाठी ‘डीआरएस’ योजना गरजेची! CM सावंतांनी मांडली योजना; दरवर्षी कचऱ्यावर 600 कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT