Rohan Khunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khunte: गोवा बनणार आशियातील स्टार्टअपचे मोठे केंद्र : रोहन खंवटे

Rohan Khunte: डिजिटल नोमॅड: ‘बेव ऑन द सी’ मंचाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Rohan Khunte: राज्यात येणारे सर्व पर्यटक भटकंतीसाठी येत नसतात. बरेचजण निसर्गसुंदर गोव्यात विश्रांती घेतानाच आपले कामही सुरू ठेवण्याच्या उद्देशाने येत असतात. अशा डिजिटल नोमॅड म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांना कामाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवणे हे क्रमप्राप्त होते.

‘बेव ऑन द सी’ या मंचाच्या माध्यमातून या सुविधा आता उपलब्ध झाल्या. यामुळे आशियातील स्टार्टअपचे मोठे केंद्र म्हणून गोवा उदयाला येण्यास वेळ लागणार नाही, असे मत माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी आज दोनापावला येथे व्यक्त केले.

या मंचाचे औपचारीक उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी देशभरातून आलेले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि कंपनीच्या संचालिका दिव्या शर्मा उपस्थित होत्या.

कंपनीच्या नामफलकाचे अनावरण केल्यानंतर खंवटे म्हणाले, राज्याच्या सकल उत्पादनात पर्यटनाचा वाटा 16.43 टक्के आहे. 35 टक्के रोजगार या क्षेत्रातून निर्माण होतो. आरोग्य पर्यटन, धार्मिक पर्यटन, साहसी पर्यटन, कौटुंबिक पर्यटन, किनारी पर्यटनाला आता या नव्या डिजीटल नोमॅड पर्यटनाची जोड द्यावी लागणार आहे. त्या दिशेने राज्याने हे पहिले पाऊल टाकले आहे.

12 हजारजण करतात गोव्यातून काम!

मी दिल्लीतून येताना विमानात एक व्यक्ती भेटली. ती ॲमेझॉनमध्ये वरिष्ठ पदावर अमेरिकेत काम करते. तिला कंपनीने तिच्या आवडीच्या ठिकाणी राहून काम करण्याची सवलत दिली आहे. त्या व्यक्तीने त्यासाठी गोव्याची निवड केली. त्यात सुमारे 12 हजार जणांचा समावेश आहे. ते विश्रांतीसाठी म्हणून येतात आणि आपले कामही सुरू ठेवतात, असे मंत्री खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Goa Live News: साखळी येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT