Goa CM Pramod Sawant Twitter/@DrPramodPSawant
गोवा

Goa निर्यात केंद्र होईल: मुख्यमंत्री

मासेमारी, कृषी, पर्यटन आणि औषधी क्षेत्रात गोव्याची मजबूत स्थिती आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकार गोव्याच्या (Goa Government) अधिक उत्पादनांसाठी भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळवण्याचे काम करीत आहे. ज्यामुळे ''फेणी'' (Feni) आणि ''खाजे'' यासारख्या उत्पादन व्यवसायात गुंतलेल्या गोवा उद्योजकांना तसेच ''खोला मिरची'' (Khola Chili) उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) बौद्धिक संपदा मिळवण्याचे अधिकार मिळतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गोवा उत्पादनांच्या सत्यतेची हमी मिळेल, अशा प्रकारे या वस्तूंसाठी निर्यात मार्ग उघडतील. गोवा हे एक निर्यात केंद्र होईल. त्यामुळे गोव्यातील अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये ''वाणिज्य उत्सव'' चे उद्‍घाटन केल्यानंतर केले.

ते पुढे म्हणाले, गोव्याला निर्यात केंद्र बनविण्यासाठी हातात हात घालून काम करायला हवे. मासेमारी, कृषी, पर्यटन आणि औषधी क्षेत्रात गोव्याची मजबूत स्थिती आहे. काजू प्रक्रिया हा राज्यातील पारंपरिक उद्योग आहे.

राज्यातील काही प्रमुख निर्यातदारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच उद्योगपतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कॉटन टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या सहकार्याने भारत सरकारच्या वाणिज्य खात्याने आणि राज्य उद्योग खाते यांच्या संयुक्त विद्यमाने ''वाणिज्य उत्सव'' आयोजित केला होता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांची आठवण म्हणून साजरा होणारा उत्सव "आझादी का अमृत महोत्सव" चा भाग म्हणून कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण सीमाशुल्क आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालयासारख्या विविध निर्यात संबंधित सरकारी संस्थांशी राज्य संवाद साधणार आहे.

केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, मुबलक जलसंपदा यासह बंदर, रेल्वे, रस्ता आणि विमानतळाची जोड उपलब्ध असल्याने गोव्यामध्ये निर्यातीची प्रचंड क्षमता आहे. उद्योगमंत्री विश्वजित राणे यांनी व्यवसायातील वातावरण सुधारण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकीस आकर्षित करण्यासाठी सरकार व्यवसाय सुलभतेच्या माध्यमातून भारतीय उद्योग बळकट करण्यात सतत गुंतलेले असल्याचे सांगितले.

निर्यात आयुक्त जे अशोक कुमार, आणि केंद्र सरकारच्या वाणिज्य खात्याचे सचिव अमिताभ कुमार,यांचीही यावेळी भाषणे झाली. टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष मनोज पाटोडिया यांनी स्वागत केले तर उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खात्याचे संचालक श्रीमती श्वेतिका सचन यांनी आभार मानले. सुभाष जाण यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT