Goa Election: पर्ये मतदारसंघात ‘राणे’ कुटुंबियांची मक्तेदारी

प्रतापसिंह राणेंची मक्तेदारी कायम, राजकीय संन्‍यास घेतल्‍यास काँग्रेसतर्फे कोण? आठव्‍यांदा विजयी होतील का?
Goa Election: Minister Vishwajit Rane's campaign is loud
Goa Election: Minister Vishwajit Rane's campaign is loudDainik Gomantak

पर्ये: गोव्याच्या राजकारणातील (Goa Politics) महत्त्वपूर्ण मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्ये मतदारसंघात ‘राणे’ कुटुंबियांची (RANE) मक्तेदारी दिसून आली आहे. पर्ये (Poriem) मतदारसंघ स्थापन झाल्यापासून म्हणजेच १९८९ पासून प्रतापसिंह राणे यांनीच येथे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तर त्यापूर्वी पर्ये हा ‘सत्तरी’ मतदारसंघाचा भाग होता तेव्हा एकवेळ सोडता ‘राणे’ यांनीच तिथे प्रतिनिधित्व केले होते.

सुरवातीला १९६३ च्या निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते जयसिंगराव राणे हे प्रजा समाजवादी पक्षातर्फे आमदार होते, तर १९६७ मध्ये आपा कामत हे बिगर राणे उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर १९७२ (मगोप) आणि १९७७, १९८० व १९८४ च्या निवडणुकीत प्रतापसिंह राणे काँग्रेसतर्फे निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत राणे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोण निवडून येणार का, असे विचारल्यास सद्यस्थितीत तरी तशी काही शक्यता दिसत नाही.

एका शक्यतेमुळे प्रतापसिंह राणे हे रिंगणातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्‍यांच्‍या वयोमानाचाही प्रश्‍‍न आहे. जर त्‍यांनी राजकीय संन्‍यास निर्णय घेतला, तर काहीजणांचे पत्ते कट होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे ‘खाशे’ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच काँग्रेस पक्षाचीही काय भूमिका आहे, हेही तेवढेच महत्त्‍वाचे आहे.

Goa Election: Minister Vishwajit Rane's campaign is loud
Goa Election: विरोधी वातावरणाचा लाभ कोणाला?

प्रतापसिंह राणे न लढण्याचे संकेत

गोव्याच्या राजकारणातील ‘भीष्‍म’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंह राणे वाढत्या वयामुळे निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. तशाही त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. काँग्रेस पक्षातर्फेही त्यांची उमेदवारी कायम असेल असे काही म्हटलेले नाही. प्रतापसिंह राणे हे ८२ वर्षांचे आहेत. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय राहण्याची शक्यता कमी दिसते. पण, भाजपमध्ये असलेले त्यांचे चिरंजीव आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे शेवटच्या क्षणी नवी चाल खेळू शकतात.

मागील निवडणुकांतील मतांची टक्केवारी
मागील निवडणुकांतील मतांची टक्केवारीDainik Gomantak

...तर परिस्‍थिती बदलेल?

प्रतापसिंह राणे यांनी राजकारणातून संन्यास घेतला तर भाजपतर्फे मंत्री विश्‍वजित राणे किंवा त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. विश्‍वजित हे पर्येतून निवडणूक लढवणार असे सांगतात. तसे झाले तर विश्‍वजित कृ.राणे, प्रशांत देसाई, गणपत गावकर यांचा भाजपतर्फे पत्ता कट होईल.

भाजपकडे व्होट बँक

मतदारसंघात पूर्वीचे भाजपचे मतदार आणि मंत्री विश्‍वजित राणे यांचे मतदार असे दोन गटातील भाजप मतदार आहेत. यातील पहिला मतदार भाजपसमवेत राहणार, तर दुसरा गट विश्‍वजित असतील तिथे जाणारा आहे. यात दुसऱ्या गटाची संख्या जास्त असल्याने विश्‍वजित यांचा उमेदवार निवडून येणार अशी चिन्हे आहेत. तरीही गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपतर्फे निवडणूक लढवलेले विश्‍वजित कृष्णराव राणे यांना ११००० हजारच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळे भाजपची स्वतःची अशी व्होट बँक येथे आहे.

उमेदवारांची अद्याप स्‍पष्‍टता नाही?

पर्येत यावेळेस कोण उमेदवार असणार याची स्पष्टता नाही. याला कारण प्रतापसिंह राणे यांचे मौन. त्यांनी जर काँग्रेसमधून लढण्याचे जाहीर केले तर भाजपकडून विश्‍वजित कृष्णराव राणे, प्रशांत देसाई, ॲड. गणपत गावकर आदी भाजप कार्यकर्त्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. प्रतापसिंह यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले तर काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही. अशावेळी रणजीतसिंग जयसिंगराव राणे यांना काँग्रेस उमेदवारी देऊ शकते. त्यांची मुलगी परिणिता राणे यांनी काँग्रेसतर्फे केरी जि.पं. मतदारसंघातून निवडणूक लढवून मंत्री विश्‍वजित प्र. राणे यांच्या उमेदवाराविरोधात २७०० मते घेतली होती.

Goa Election: Minister Vishwajit Rane's campaign is loud
Goa Assembly Election: युती, महाआघाडी; गणित बिघडतेय

विश्‍वजित राणे सक्रिय

मतदारसंघात भाजपा, काँग्रेस किंवा आम आदमी आदी कोणत्याच पक्षाकडून आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. किंवा तशा हालचालीही दिसत नाहीत. विश्‍वजित प्र. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून येथील काँग्रेस पक्षाचे कार्य ठप्प झाले आहे. या काळात इथला काँग्रेस पक्ष आमदारापुरता मर्यादित आहे. पक्ष संघटनेचे अजिबात कार्य दिसत नाही. उलट भाजपचे कार्य मंत्री विश्वजित यांच्या नेतृत्वाखाली जोरात सुरू आहे. सध्या तरी पर्येंतून त्यांना पक्षातर्फे अथवा कुठली संघटना सहसा विरोध करताना दिसत नाही.

इतर पक्षांचे कार्य नाहीच

मागील निवडणुकीत ‘आप’तर्फे निवडणूक लढलेले सीताराम गावस यावेळेस सक्रिय नाहीत. तर होंडा जिल्हा पंचायत मतदारसंघातून ‘आप’तर्फे उमेदवार असलेले माडकर यांचा पत्ता नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणारे ॲड. गणपत गावकर हे मतदारांच्या संपर्कात आहेत. व्यक्तिगत प्रचारावरच त्यांनी भर दिला आहे. मगोप, गोवा फॉरवर्ड यांचे कार्य येथे काहीच नाही. पण आयत्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला या पक्षांतर्फे उमेदवारी मिळू शकते. पर्येतील माजी पंचायत सदस्य गुरुदास गावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथे ते रिंगणात असू शकतात.

ॲड. गावकर काय करणार?

इतर कोणतेही उमेदवार ठरत नसले तरी कुंभारखण गावचे ॲड. गणपत गावकर हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. भाजपशी निगडित असलेले ॲड. गावकर यांनी जि. पं. निवडणुकीत अपक्ष राहून २६०० मते मिळवली होती. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांवेळी भाजपतर्फे इच्छुक असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. सत्तरीतील जमीन मालकीच्या विषयावरून सर्वसामान्य लोकांशी त्यांचा सतत संपर्क असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com