Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Ravindra Bhavan Goa : रवींद्र भवनात संगीत, नाट्यकलेचे वर्ग सुरू करण्यात अडचण काय? कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा खडा सवाल

Ravindra Bhavan Goa : एखाद्या खासगी संस्थेचे हित जपण्याचे प्रयत्न केले जात आहेत का?, असा थेट सवाल दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी विचारला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

रवींद्र भवनने रविवार, ३० जून रोजी फिल्म क्लबच्या उद्‌घाटनाची घोषणा केली आहे.

रवींद्र भवन, मडगाव येथे संगीत, नृत्य आणि नाट्यकलेचे वर्ग का सुरू होत नाहीत? कुणा व्यक्तीचे हितसंबंध गुंतले आहेत का? एखाद्या खासगी संस्थेचे हित जपण्याचे प्रयत्न केले जात आहेत का?, असा थेट सवाल दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी विचारला आहे.

रवींद्र भवनने फिल्म क्लब सुरू करण्याच्या केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी रवींद्र भवनने प्रथम स्वतःचे घर व्यवस्थित करण्यावर भर द्यावा आणि इतर विभागांच्या कामात हस्तक्षेप करणे थांबवावे, असे आवाहन केले आहे.

रवींद्र भवनात नियमित संगीत, नृत्य आणि नाट्य वर्ग सुरू करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत. आमच्या जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी यापूर्वी ही मागणी केली होती. दुर्दैवाने रवींद्र भवन व्यवस्थापनाने त्यानंतर कोणतीही पावले उचलली नाहीत, असे फर्नांडिस म्हणाले.

रवींद्र भवन, मडगाव हे संपूर्ण सासष्टी तालुक्याचे सांस्कृतिक केंद्र आहे. नियमित संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रवींद्र भवन समिती इतर सर्व काही करत आहे, परंतु सदर वर्ग सुरू करण्यासाठी पावले उचलत नाही, असे त्‍यांनी नमूद केले.

‘रवींद्र भवन’वर हितसंबंध असलेल्यांना नेमू नये !

सरकारने गोवा मनोरंजन संस्थेला चित्रपटाशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी नोडल एजन्सी म्हणून घोषित केले आहे.

फिल्म क्लब आणि चित्रपटाशी संबंधित उपक्रमांची काळजी घेणे हे गोवा मनोरंजन संस्थेची जबाबदारी आहे. रवींद्र भवनने मुलांना आणि तरुणांना ‘परफॉर्मिंग आर्ट्स’चे प्रशिक्षण देऊन कला आणि संस्कृतीला चालना देण्यावर भर दिला पाहिजे.मला आशा आहे की, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे माझ्या मागणीची दखल घेतील आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सर्व वर्ग सुरू करण्याच्या सूचना देतील.

रवींद्र भवनच्या व्यवस्थापकीय समितीवर आपले वैयक्तिक हितसंबंध असलेल्या आणि खासगी संस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सरकारने नेमू नये, अशी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT