Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: संगीत शिक्षक उमेदवारांसाठी कला व संस्कृती मंत्र्यांनी दिलीय महत्वाची माहिती; म्हणाले, भरती नियमात..

दक्षिण गोव्यात जागा उपलब्ध झाल्यावर तेथे पाश्चिमात्य संगीत केंद्र सुरू केले जातील

गोमन्तक डिजिटल टीम

Govind Gaude पाश्चिमात्य संगीत शिक्षक भरतीसाठी भरती नियम शिथिल करण्याचा प्रयत्न करू, असे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.

रेजिनाल्ड म्हणाले, गेली कित्येक वर्षे पाश्चिमात्य संगीत शिकवण्यासाठी हंगामी, तासिका तत्त्वावर शिक्षक काम करत आहेत. त्यांना सेवेत का कायम केले जात नाही. त्या शिक्षकांनी खासगी शिकवणीचे वर्ग घेतले तर ते जादा उत्पन्न कमवू शकतात.

त्यांना हातचे न घालवण्यासाठी सेवेत घ्यावे. दक्षिण गोव्यातून दररोज २६ विद्यार्थी पाश्चिमात्य संगीत शिकण्यासाठी पणजीत येतात.

याला उत्तर देताना कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले, की दक्षिण गोव्यात जागा उपलब्ध झाल्यावर तेथे पाश्चिमात्य संगीत केंद्र सुरू केले जाईल. कलाकारांसाठी शिक्षक होण्यासाठी शैक्षणिक पात्रताच हवी या मताशी सहमत नसलो तरी भरती नियम तसे सांगतात.

नियम रद्द करता येत नाहीत; कारण आज शिक्षण घेणारे उद्या त्या नियमांतर्गत पात्र ठरणार आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ देता कामा नये. १३ जण कार्यरत असून २ जागा रिक्त आहेत.

विद्यार्थ्यांना त्रास

आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले, प्रत्येकालाच पणजीपर्यंत प्रवास करणे शक्य होत नाही. गरीब व होतकरू विद्यार्थी त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात.

मडगावला जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत मध्यवर्ती ठिकाणी आहे. तेथे आवश्यक ती डागडुजी करून ती वापरात आणता येणे शक्य आहे.

नियम बदला किंवा...

आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी हंगामी, तासिका तत्त्वावरील उमेदवार भरती नियमांच्या निकषात बसत नसेल तर सध्याचे पाश्चिमात्य संगीत शिक्षण हलक्या दर्जाचे आहे असे मानावे का, तसे नसेल तर याच शिक्षकांना कायम करण्यासाठी भरती नियमांत दुरुस्ती करणे किंवा भरती नियमांतून सूट देण्याचा पर्याय सरकार का वापरत नाही, अशी विचारणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'आज त्रास, उद्या विकास', पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल राज्यपालांकडून खेद व्यक्त; दीर्घकालीन फायद्याची दिली ग्वाही

Donald Trump: "मीच नाटोचा तारणहार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा धमाका; ग्रीनलँडवर फडकणार अमेरिकेचा झेंडा?

IND VS NZ: विजयानंतरही 'BCCI'चा मोठा निर्णय; भारतीय ताफ्यात नवा भिडू सामील, वॉशिंग्टन सुंदर बाहेर

Goa Winter Session 2026: 'कुशावती' जिल्हा निर्मिती, खाणकाम अन् विकासाचा नवा रोडमॅप; राज्यपालांच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे

Goa Assembly Session: "मी कोणताही वैयक्तिक कायदा बनवलेला नाही" मंत्री विश्वजित राणे

SCROLL FOR NEXT