Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: सौम्य थंडीची चाहूल, कोरडे हवामान; वेधशाळेने सांगितला पुढील चार दिवसांचा अंदाज

Goa Weather Update: बुधवारी राज्यात कमाल ३३.५ अंश सेल्सिअस तर किमान २०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Sameer Panditrao

Weather in Goa

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून पुन्हा सौम्य थंडी पडत आहे. पुढील चार दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असून सौम्य थंडी पडणार असल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे. बुधवारी राज्यात कमाल ३३.५ अंश सेल्सिअस तर किमान २०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्यात मागील काही दिवसांपासून उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु आता मागील दोन-तीन दिवसांपासून सौम्य थंडी जाणवत आहे. परंतु दुपारी मात्र मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असल्याने नागरिक हैराण आहेत.

पुढील ४८ तासांत राज्यातील कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पहाटे धुके आणि दव पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात थंडीचा अधिक प्रभाव प्रामुख्याने ग्रामीण तसेच घाटालगतच्या भागात जाणवत आहे.

रुग्णांत वाढ!

पहाटे आणि रात्री थंडी आणि दुपारी मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या उष्म्यामुळे थंडी, पडशाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे लहान मुले आणि खासकरून ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घ्यावी, योग्य आहार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT