Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात 2 दिवस पावसाचे, यलो अलर्ट जारी; सततच्या हवामान बदलामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत

Rain Alert In Goa: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत आहे. या अनिश्चित हवामानामुळे शेतकरी आणि बागायतदार यांची चिंता वाढली आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत आहे. या अनिश्चित हवामानामुळे शेतकरी आणि बागायतदार यांची चिंता वाढली आहे. आता हवामान विभागानं २५ आणि २६ एप्रिल २०२५ या २ दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

सततच्या वातावरणातील बदलामुळं गोमंतकीय हैराण झाले आहेत. प्रत्येक दिवशी वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. कधी कडक ऊन, तर कधी गडगडाटासह पावसाची हजेरी लागते.

राज्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसाठी हे अस्थिर हवामान धोक्याची घंटा ठरत आहे. मार्च ते मे हा कालावधी आंबा आणि काजूच्या उत्पादनाचा अत्यंत महत्त्वाचा हंगाम मानला जातो. मात्र, सततच्या बदलत्या हवामानामुळे फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाल्यानं अनेक झाडे कोसळली होती. या पावसात लाखो रुपयांचे नुकसान झालं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT